• Download App
    Chief Minister Fadnavis मुख्यमंत्री फडणवीसांनी केले भारतीय

    Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी केले भारतीय सैन्याचे कौतुक; भारत झुकणार नाही, हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले

    Chief Minister Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Chief Minister Fadnavis भारतीय सेनेने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर यशस्वीपणे राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या धाडसी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल भारतीय सेनेचे आभार मानण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईत आज भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर या रॅलीचा समारोप झाला.Chief Minister Fadnavis

    या समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार, पंकजा मुंडे, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे अनेक नेते आणि हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय सेनेच्या पराक्रमाचे जाहीर कौतुक केले आणि पाकिस्तानला दिलेल्या कडक प्रत्युत्तराचा उल्लेख करत देशवासियांना अभिमानाची जाणीव करून दिली.



    नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ऑपरेश सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सेनेने दाखवून दिले, हमें कोई झुका नहीं सकता, हम ना झुकेंगे, न बिकेंगे, न थकेंगे अशा प्रकारे भारतीय सेनेची ताकद काय आहे? ही ताकद आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहलगामध्ये आमच्या 25 बांधवांना ज्याप्रकारे धर्म विचारून मारण्यात आले. कुटुंबासमोर मारण्यात आले. बायकोसमोर नवऱ्याला मारले, मुलांसमोर बापाला मारले, अशा प्रकारचे बर्बरतापूर्ण हत्याकांड या भारताच्या नव्हे, तर जगाच्या इतिहासात अलिकडच्या काळात आपल्याला पाहायला मिळाले नव्हते.

    मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हे लॉन्च केले. आमच्या भगिनींचे कुंकू पुसण्याचे काम ज्या दहशतवाद्यांनी आणि ज्या देशाने केले होते, त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली. ऑपरेशन सिंदूरमध्ये अतिशय अचूक पद्धतीने भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करून टाकले, असे फडणवीस म्हणाले.

    मला सर्वात जास्त आनंद कशाचा असेल, तर ज्या ठिकाणी हरामखोर कसाबने प्रशिक्षण घेतले. तो अड्डा देखील नेस्तनाबूत करण्याचे काम केले. इतकेच नाही, तर आपल्या मुंबईचे अपराधी असलेले मकसूद अजहर, अबू जिंदल त्यांनाही ठोकण्याचे काम आपल्या सैन्याने केले. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात शेवटच्या टोकाला जिथे त्यांना वाटायचे इथे कधीच भारतीय सेना पोहोचू शकत नाही. म्हणून सगळ्या आतंकवाद्यांना सगळ्या परिवारासह राहण्यासाठी जागा दिली होती. ज्या ठिकाणी या आतंकवाद्यांसाठी सेफ हाउस तयार केले होते. नेमके तिथेच जाऊन भारतीय सेनेने ठोकले आणि सगळे अड्डे उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याने दाखवून दिले की, तुम कहीं पर छुपोगे, हम घुसकर मारेंगे, हम तुमको छोडने वाले नहीं है, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा एकही हल्ला यशस्वी होऊ शकला नाही, याचा मला अभिमान आहे. त्यांनी मोठ्याप्रमाणात मिसाइलचा वापर केला, पण त्यांचे सगळे मिसाइल भारतीय सेनेने हवेतच उडवून दिले. त्यांनी ड्रोनचा वापर करायचा प्रयत्न केला, तरीही त्यांचा एकही ड्रोनचा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही. त्यांनी एफ-16 चा वापर करायचा प्रयत्न केला, त्यांचे एफ-16 पाडण्याचे काम आपल्या डिफेन्स सिस्टिमने केले. भारताने हे दाखवून दिले की, आमची डिफेन्स सिस्टिम इतकी मजबूत आहे की, त्याच्यामध्ये घुसण्याची ताकद पाकिस्तानची नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    पाकिस्तान भारतावर एकही हल्ला यशस्वीपणे करू शकला नाही. पण ज्यावेळी त्यांनी हल्ला केला, त्यावेळी त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता भारताने जेव्हा त्यांच्या सैन्य तळांवर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तान घाबरला. पाकिस्तानला भारताची ताकद माहिती नव्हती. ब्रम्होस ताकद माहिती नव्हती. ज्यावेळी त्यांचे एक-एक सैनिकी तळ उद्ध्वस्त झाले, त्यावेळी हाच पाकिस्तान सगळ्या देशांकडे गेला. आता मध्यस्थी करा, युद्धबंदी करा, अशी विनवणी केली. भारताने सांगितले, पाकिस्तानला युद्धबंदी करायची असेल, तर त्याने आमच्यापुढे गुडघे टेकावे. त्यांच्या सैनिकी अधिकाऱ्यांनी आम्हाला फोन करून विनंती करावी, तर आम्ही युद्धबंदी करू. पाकिस्तानच्या सेनेला आपल्याला फोन करून विनंती करावी लागली. त्यानंतर ही युद्धबंदी झाली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    भारतीय सैन्य अभेद्य आहे. सैन्याच्या शौर्याच्या सन्मानासाठी, भारताची ताकद जगाला दाखवण्यासाठी ही तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

    Chief Minister Fadnavis praised the Indian Army

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Government introduces : लैंगिक शोषण रोखण्यासाठी सरकारची शाळांसाठी नवी नियमावली

    शरद पवार NDA सोबत असते, तर ते राष्ट्रपती झाले असते; हा रामदास आठवलेंचा टोला, टोमणा की जखमेवर मीठ??

    CM Fadnavis : सीएम फडणवीस म्हणाले- आमच्या तिघांमध्ये आता स्पीड ब्रेकरला जागा नाही; महामुंबई मेट्रो 9चा चाचणी टप्पा पूर्ण