स्थानिक स्वराज्य संस्थांना 15व्या वित्त आयोगाचा निधी वेळेत मिळावा, यावरही त्यांनी भर दिला
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गडचिरोली माईनिंग हब, नागपूर विमानतळ विकास आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वित्त आयोग निधी यासंबंधी चर्चा केली.
गडचिरोलीला माईनिंग हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राच्या सहकार्याची आवश्यकता आहे, तसेच नागपूर विमानतळाच्या विकासासाठी केंद्राच्या मदतीची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांना 15व्या वित्त आयोगाचा निधी वेळेत मिळावा, यावरही त्यांनी भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयांवर सकारात्मक प्रतिसाद दिला.
यासोबतच, वर्ल्ड ऑडिओ, व्हिज्युअल आणि एन्टरटेनमेंट समिट महाराष्ट्रात होणार असून, यासाठीची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
तसेच, मुंबईत आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटी (इंडियन इन्स्टिट्युट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी) स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे, याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
Chief Minister Fadnavis meets Prime Minister Modi discusses state projects
महत्वाच्या बातम्या