• Download App
    Chief Minister Fadnavis दोंडाईचा सौर प्रकल्पासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे ऊर्जा विभागाला विशेष निर्देश, म्हणाले...

    दोंडाईचा सौर प्रकल्पासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे ऊर्जा विभागाला विशेष निर्देश, म्हणाले…

    प्रकल्पग्रस्तांना एक महिन्यात सानुग्रह अनुदान वितरित करण्यासही सांगतिले आहे. Chief Minister Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे दोंडाईचा, जि. धुळे सोलार पार्कसंदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऊर्जा विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महानिर्मितीने दोंडाईचा येथे 250 मेगावॅटच्या सौर प्रकल्पासाठी 476.76 हेक्टर खासगी जमीन अधिग्रहित केली आहे, या प्रकल्पासाठी आवश्यक तेवढीच जमीन घ्या, प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन स्थानिक प्रशासनाने गतीने सानुग्रह अनुदान वितरित करावे.



    सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 1000 एकर जमिनीची आवश्यकता आहे, जर 1350 हेक्टर जमीन प्राप्त झाली तर 900 एकरवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारावा तसेच उर्वरीत जागा एमआयडीसीला देण्यात यावी. सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सौर ऊर्जेसाठी पॅनल तसेच इतर यंत्रणा उभारावी, टाटा पॉवर कंपनीने ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    या बैठकीला मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    Chief Minister Fadnavis gives special instructions to the Energy Department for the Dondai solar project

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस