‘’स्वार्थाच्या कॅमेऱ्यातून आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर…’’ असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवेसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना, जोडे पुसायची लायकी नसलेली राज्यकर्ते, ज्या पद्धतीने पाठीत वार करून सरकार पाडलं त्याचा सूड आणि बदला घेणारचं असे उद्गार काढले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.Chief Minister Eknath Shinde responded to Uddhav Thackerayes criticism
‘’बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही. आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती मुळी आमची वृत्तीच नाही. आम्हाला बदल घडवायचा आहे. या राज्यातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे. गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल घडवायचा आहे.’’ असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
याचबरोबर ‘’स्वार्थाच्या कॅमेऱ्यातून आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर खरे चित्र कधीच उमटत नाही. त्यासाठी निस्वार्थी जनसेवेचा कॅमेरा माणसाकडे असावा लागतो. तुमच्याकडे तो कधीच नव्हता आणि येण्याची शक्यताही नाही.’’ असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? –
‘’जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं होणार काय? मी मुख्यमंत्री म्हणून मला जे काही शक्य होतं, ते मी केलं. ज्या पद्धतीने पाठीत वार करून सरकार पाडलं त्याचा सूड आणि बदला घेणारचं’’ अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी टीका केली होती.
Chief Minister Eknath Shinde responded to Uddhav Thackerayes criticism
महत्वाच्या बातम्या
- मौत ते सौदागर” ते “विषारी साप” व्हाया “कबर खुदेगी”; नरेंद्र मोदींना 91 वेळा काँग्रेसची शिवीगाळ!!
- जोडे पुसणारे राज्यकर्ते, उद्धव ठाकरेंची घसरली जीभ; वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या…; एकनाथ शिंदेंचे चोख प्रत्युत्तर
- सुदानमधून २४६ भारतीयांना घेऊन हवाई दलाचे विमान मुंबईत पोहोचले; भावूक महिला म्हणाली, ‘’पंतप्रधान मोदी…’’
- आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा राहुल गांधींना सवाल, ‘हिंमत असेल तर पवारांच्या अदानींसोबतच्या संबंधांवर प्रश्न विचारा?’