’एकजुटीने लढुया आणि एकजुटीने जिंकुया’ असं आवाहनही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शासकीय योजना आणि अंमलबजावणी संदर्भात महायुती पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा शनिवारी षण्मुखानंद सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी एकजुटीने काम करून पुन्हा राज्यात सत्ता आणू असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना केले.Chief Minister Eknath Shinde criticized the opposition while speaking at the state level meeting of Mahayuti office bearers
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, खासदार नारायण राणे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक मंत्री तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना, विरोधकांच्या फेक नरेटिव्हला कार्यकर्त्यांनी ताबडतोब उत्तर दिले तर विरोधकांचे मनसुभे उधळले जातील. महायुती सरकारच्या दोन वर्षातील कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवा असे आवाहन याप्रसंगी उपस्थितांना केले.
राज्य सरकारने दोन वर्षात १३० सिंचन प्रकल्पांना सुप्रमा दिल्या. मविआने केवळ ४ सुप्रमा दिल्या होत्या. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून गरजूंना २५० कोटींची मदत दिली. अडीच कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून १५०० रुपये दरमहा दिले जाणार आहेत.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’, ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजना कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्हा, तालुका, गावातील घरोघरी पोहोचवल्या तर आगामी निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे असे यासमयी आवर्जून सांगितले.
Chief Minister Eknath Shinde criticized the opposition while speaking at the state level meeting of Mahayuti office bearers
महत्वाच्या बातम्या
- Ravikant Tupkar : विकांत तुपकर विधानसभेला बुलढाण्यातील सर्व जागा लढवणार; बच्चू कडूंसह तिसऱ्या आघाडीची तयारी
- लक्ष्मण हाके म्हणाले- पवारांकडून माझे तिकीट फायनल होते पण नंतर काय झाले हे त्यांनाच ठाऊक
- विधानसभेसाठी महायुतीची तयारी; फडणवीसांनी प्रवक्त्यांचे टोचले कान, 200 जागा जिंकण्याचे गणितही सांगितले
- हातरस घटनेतील आरोपी देव प्रकाश मधुकर याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी