विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावरून राजकीय घमासान सुरू असताना तसेच ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये दरार पैदा झाली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातल्या धबडग्याच्या पलीकडे जाऊन राजधानी दिल्लीतल्या भारत मंडप मध्ये सुरू असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI समिटमध्ये महाराष्ट्रासाठी मोठी मुशाफिरी केली. महाराष्ट्राने आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मध्ये केलेल्या कामाची दखल जगाने घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शेतीमध्ये वापर या विषयावर व्यापक विचार विनिमय केला. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी काही महत्त्वपूर्ण करार सुद्धा केले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली.Chief Minister Devendra Fadnavis’ visit to the AI Summit in Delhi; Important agreements and announcements for Maharashtra
– देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट असे :
– आज नवी दिल्ली येथे झालेल्या “इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६” मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉ. प्रत्युष कुमार यांनी जीओएम आणि सर्वम एआय यांच्यात लेटर ऑफ इंटेंट (एलओआय) ची देवाणघेवाण केली. या सहकार्याचे उद्दिष्ट राज्यभरात मोठ्या प्रमाणात स्वतंत्र आणि स्वयं आधारित AI पायाभूत सुविधा निर्माण करणे आहे.
– मोठ्या प्रमाणात, वास्तविक-जागतिक AI प्रयोग सक्षम करण्यासाठी सार्वभौम एआय पायाभूत सुविधांची स्थापना
– शिक्षण, आरोग्य, शेती, कल्याणकारी वितरण आणि सार्वजनिक प्रशासनात AI पाया मजबूत करणे
– संशोधन, नवोन्मेष आणि तांत्रिक विकासाची प्रगती
– उदयोन्मुख AI डोमेनमध्ये कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाला प्रोत्साहन देणे
– २० मेगावॅटची सार्वभौम AI – ऑप्टिमाइज्ड संगणक क्षमता तयार करणे, ५० मेगावॅटपर्यंत स्केलेबल ही भागीदारी महाराष्ट्राच्या डिजिटल सार्वभौमत्व आणि AI वाढीला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
– यावेळी मंत्री अॅड. आशिष शेलार, सर्वम एआयचे संस्थापक डॉ. प्रत्युष कुमार आदी उपस्थित होते.
Chief Minister Devendra Fadnavis’ visit to the AI Summit in Delhi; Important agreements and announcements for Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- नारी तू नारायणी’ परिषदेचे २१ फेब्रुवारीला पुण्यात आयोजन; महिलांच्या आत्मनिर्भरतेवर होणार विचारमंथन
- Tarique Rahman : बांगलादेशी पंतप्रधान तारिक रहमान यांच्यावर निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा विरोधकांचा आरोप
- महाविकास आघाडीची पुरती झाली गोची; दोन मोठे “वजीर” बनलेत खासदारकी आणि आमदारकीसाठी “प्यादी”!!
- Canada : कॅनडाने 2025 मध्ये 2,800 भारतीयांना बाहेर काढले, 6,500 भारतीयांना बाहेर काढण्याची तयारी