• Download App
    Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील विजयाला आव्हान!

    Devendra Fadnavis

    मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समन्स पाठवून मागितले उत्तर


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर :Devendra Fadnavis  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या याचिकेसंदर्भात खंडपीठाने फडणवीस यांना समन्स बजावले आहेत आणि त्यांचा प्रतिसाद मागितला आहे.Devendra Fadnavis

    नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल विनोदराव गुडाडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला आव्हान दिले आहे. मतदान प्रक्रियेतील त्रुटी आणि भ्रष्टाचाराचा आरोप करणारी याचिका त्यांनी दाखल केली होती, ज्यावर न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर मागितले आहे.



    गुडाडे यांचे वकील आकाश मून यांनी सांगितले की, “आम्ही उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे.” आमचे क्लायंट प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांनी २०२४ मध्ये नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर आलेले निकाल खूपच अनपेक्षित होते. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचा विजय, तो सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता. येथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अनेक शंकांनी वेढलेली होती. निष्पक्ष निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक आवश्यकता सरकारने किंवा भारतीय निवडणूक आयोगाने पूर्ण केल्या नाहीत.

    ते म्हणाले, काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सुमारे १७ याचिका दाखल केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की निवडणूक व्यवस्थापित झाली आणि निवडणूक आयोगाने ईव्हीएमबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. या याचिकांच्या संदर्भात विजयी उमेदवाराला समन्स बजावण्यात आले आहेत.

    Chief Minister Devendra Fadnavis victory in the assembly is being challenged

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस