विशेष प्रतिनिधी
पुणे :Devendra Fadnavis ब्रिटीश व काही स्वदेशी इतिहासकारांनी मराठा साम्राज्यातील अनेक नायकांवर अन्याय . इंग्रजांनी व काही अंशी स्वकियांनीही आपल्या इतिहासातील अनेक नायकांवर अन्याय केला. किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्याचा व मराठी साम्राज्याचा इतिहासच इतिहासातून डिलीट करून टाकला, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. (Chief Minister Devendra Fadnavis alleges that British and some indigenous historians have also done injustice to our heroes.)Devendra Fadnavis
पुण्यातील एनडीए येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, थोरल्या बाजीराव पेशव्यांची वेग हीच सर्वात मोठी रणनीती होती. जेव्हा मोगल साम्राज्याची सेना एका दिवसात 8-10 किलोमीटर प्रवास करायची, तिथे थोरल्या बाजीरावांनी एक अशी सेना तयार केली की, ती एका दिवसात 60-70 किलोमीटर प्रवास करत होती. हेच त्यांचे युद्ध कौशल्य होते.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
ते पुढे म्हणाले, जनर मोंटॅगोमेरी हे दुसऱ्या महायुद्धातील निर्णायक युद्धाचे नायक ठरले. त्यांनी जभरातील योद्धांच्या संदर्भात लिहिलेल्या पुस्तकात पालखेडच्या लढाईचा उल्लेख केला. धोरणात्मकदृष्ट्या हे एक सर्वोत्तम युद्ध होते, असा उल्लेख त्यांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांचा केला. पण काही ब्रिटिश व काही स्वदेशी इतिहासकारांनी मराठा साम्राज्यातील आमच्या अनेक नायकांवर घोर अन्याय केला. किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्याचा व मराठी साम्राज्याचा इतिहासच त्यांनी आपल्या इतिहासातून डिलीट करून टाकला. यामुळे आपल्याला वाटते की, मोगलानंतर थेट इंग्रजच इथे आले आणि त्यांनी आपल्यावर राज्य केले. यामुळे आपल्याला आपल्या महानायकांचा विसर पडला.
मुख्यमंत्री म्हणाले, पण आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आपल्या नायकांचा, योद्ध्यांचा, स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सेनानी म्हणून त्याच साम्राजाचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणारे थोरले बाजीराव पेशवे यांचा सुंदर पुतळा एनडीएमध्ये उभारण्यात आला आहे. त्यांच्या पुतळ्यासाठी याहून चांगले ठिकाण दुसरे कोणतेच असू शकत नाही. आपले युद्ध कौशल्य जिथे शिकवले जाते, तिथेच हा पुतळा उभा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या स्थानाची निवड करणाऱ्या समितीचे मी कौतुक करतो.
Chief Minister Devendra Fadnavis alleges that historians are doing injustice to our heroes and the history of the Maratha Empire.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसचे गमावलेले “राजकीय शहाणपण” परत येणार कधी??; संघावर बंदी घालायची काँग्रेस नेत्यांची खुमखुमी संपणार कधी??
- Delhi High Court : लोकसभा सभागृहात उडी घेऊन खासदारांना घाबरविणे देशविरोधी नाही? दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
- राहुल गांधींच्या कामाचा लेखाजोखा; लोकसभेत तर बोलले कमीच, पण विरोधी पक्षनेत्यांच्या मांदियाळी तरी कुठे लागला दिवा??
- ठाकरे बंधू आणि भाजपच्या धुमश्चक्रीत काँग्रेस पडली बाजूला; पवारांच्या राष्ट्रवादीलाही कुणी विचारेना!!