• Download App
    मुंबई विमानतळावर विक्रमी वर्दळ; दिवसात 91 हजार प्रवासी, कोरोना आल्यापासूनची सर्वोच्च स्थिती|Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA), handles a record of 91,904 passengers in a single day, the highest since pandemic.

    मुंबई विमानतळावर विक्रमी वर्दळ; दिवसात 91 हजार प्रवासी, कोरोना आल्यापासूनची सर्वोच्च स्थिती

    प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) जगातील सर्वात व्यस्त एकल धावपट्टी विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावर 17 ऑक्टोबरला एकाच दिवसात 91 हजार 904 प्रवाशांची ये-जा झाली. कोरोना महामारी आल्यापासूनची एका दिवसातील ही सर्वोच्च वर्दळ आहे.Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA), handles a record of 91,904 passengers in a single day, the highest since pandemic.

    लसीकरणाची वाढती टक्केवारी, कोविड बाधितांची घटती संख्या आणि प्रवासावरील निर्बंध आणखी शिथील होणे या कारणाने विमान प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळेच 23 मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच 17 ऑक्टोबर 2021 रोजी विक्रमी 91,904 प्रवासी मुंबई विमानतळाने पाहिले.



    यातल्या सुमारे 75 हजार 944 प्रवाशांनी टर्मिनल 2 येथून प्रवास केला. एकूण 37 हजार 315 प्रवासी मुंबई विमानतळावर पोहोचले तर 38 हजार 629 प्रवाशांनी विमानतळावरून उड्डाण केले. तर 15 हजार 960 हून अधिक प्रवाशांनी टर्मिनल 1 (T1) मधून प्रवास केला.

    यातील 7 हजार 690 प्रस्थान करणारे प्रवासी आणि 8 हजार 270 प्रवासी उतरणारे होते. 17 ऑक्टोबर या दिवशी मुंबई विमानतळावरील टर्मिनल 1 वरुन एकूण 114 देशांतर्गत उड्डाणे पूर्ण झाली, तर टर्मिनल 2 वरुन एकूण 494 उड्डाणे झाली. यातली 415 देशांतर्गत आणि 79 आंतरराष्ट्रीय उड्डाणे होती.

    कोरोना साथीनंतर टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 वरून बहुतांश प्रवासी दिल्ली, बेंगळुरू आणि गोवा या तीन ठिकाणी गेले. दरम्यान, सर्वोच्च विमान प्रवासी वाहतुकीचा विक्रम सन 2018 मध्ये झाला होता.

    त्या वर्षी मुंबई विमानतळावरुन एका दिवसात 1 हजार 4 विमाने उडाली किंवा उतरली होती. यातली 903 विमाने पूर्वनियोजित होती. 59 विमाने ऐनवेळी उडाली. तसेच 8 चार्टर, 32 मालवाहक आणि 3 लष्करी उड्डाणे होती.

    Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA), handles a record of 91,904 passengers in a single day, the highest since pandemic.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस