विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, विकासनगर, लेबर कॉलनी परिसरात आधुनिक आणि भव्य ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक व इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी संग्रहालय’ उभारण्यासाठी ९२.९२ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.Chhatrapati Sambhajinagar
सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. ही उभारणी सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंमलबजावणीखाली करण्यात येणार आहे. अंदाजपत्रकानुसार एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे १०,६९६ चौ.मी. इतके असून त्यावर इमारतीसाठी २८.४७ कोटी, वीज व पाणीपुरवठा यांसाठी ३.०३ कोटी, परिसर विकासासाठी ४.३२ कोटी आणि इतर खर्च, कर व सल्लागार मानधन यांसह एकूण ९२.९२ कोटी खर्चाचा अंदाज आहे. यासाठी आवश्यक जागा मिळवण्याची आणि अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांची राहील.Chhatrapati Sambhajinagar
विजयस्तंभ, प्रदर्शनगृह, फूड प्लाझा असणार
स्मारक संकुलात भव्य प्रदर्शनगृह, विजयस्तंभ, फूड प्लाझा, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एअर कंडिशनिंग, सीसीटीव्ही व्यवस्था, पर्जन्यजल साठवण टाकी आणि अत्याधुनिक इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी विभागाचा समावेश असेल. स्मारकाच्या ठिकाणी पुरेशी वाहने पार्किंग आणि वाहतूक नियंत्रण सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ऐतिहासिक घटना तंत्रज्ञानाच्या मदतीने होतील जिवंत
“इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी संग्रहालय” म्हणजे ‘अनुभवात्मक तंत्रज्ञानावर आधारित संग्रहालय’. जेथे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतिहास, विज्ञान, संस्कृती किंवा निसर्ग जिवंत अनुभवता येतो. “इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी संग्रहालय ” म्हणजे असा संग्रहालयाचा प्रकार, जिथे प्रदर्शन फक्त पाहायचे नसते, तर त्यात ‘अनुभव’ घ्यायचा असतो. म्हणजेच प्रेक्षकांना तिथल्या वस्तू, कथा किंवा ऐतिहासिक घटना आपल्या डोळ्यांसमोर जिवंत झाल्यासारख्या अनुभवता येतात.
Chhatrapati Sambhajinagar Marathwada Liberation War Museum Sanctioned ₹92.92 Crore
महत्वाच्या बातम्या
- Trump : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात ‘नो किंग’ निदर्शने; हजारो लोक रस्त्यावर उतरले
- mohan bhagwat : सरसंघचालक म्हणाले- आपल्याला ‘मॅकॉले नॉलेज सिस्टिम’पासून मुक्त व्हावे लागेल; यामुळे आपले विचार परकीय झाले
- Louvre Museum : फ्रेंच संग्रहालयातून नेपोलियनचे 9 मौल्यवान दागिने चोरीला; चोरांनी भिंतीवर चढून कटरने खिडकी कापून आत प्रवेश केला
- Nilgiri Railway : तामिळनाडूच्या नीलगिरी रेल्वे मार्गावर भूस्खलन, अनेक ट्रेन रद्द, पुढील 7 दिवस दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा