Friday, 9 May 2025
  • Download App
    छत्रपती संभाजीनगर मध्ये महाआरोग्य शिबिरात विक्रम; तब्बल 3.5 लाख रुग्णांना तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंतचे मोफत लाभ!!|Chhatrapati Sambhajinagar; As many as 3.5 lakh patients get free benefits from examination to surgery!!

    छत्रपती संभाजीनगर मध्ये महाआरोग्य शिबिरात विक्रम; तब्बल 3.5 लाख रुग्णांना तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंतचे मोफत लाभ!!

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजी नगर मध्ये मंत्री संपन्न झालेल्या महाआरोग्य शिबिरात मोठा विक्रम झाला असून तब्बल साडेतीन लाख रुग्णांना यातून तपासणी सह शस्त्रक्रियेपर्यंतचे लाभ मिळाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शिबिराला मार्गदर्शन केले. या शिबिरात संभाजीनगर मधले अनेक प्रतिथयश यश डॉक्टर्स सहभागी झाले होते. शिबिराला गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदी नेते उपस्थित होते. भाजपचे स्थानिक नेते राजेंद्र साबळे पाटील या शिबिराचे आयोजक होते.Chhatrapati Sambhajinagar; As many as 3.5 lakh patients get free benefits from examination to surgery!!

    यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील मोदी सरकारने आणि महाराष्ट्रातील शिंदे -,फडणवीस सरकारने जनतेच्या आरोग्यासाठी घेतलेल्या विविध निर्णय यांचा आढावा घेतला. कोरोना काळात केंद्रातील मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली झालेल्या आरोग्य विषयक कामगिरीचा फडणवीस यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. त्याच वेळी केंद्राने जनआरोग्य सुविधा व्यापक करण्याबरोबरच आयुष्मान भारत योजनेतून कोट्यवधी लोकांना लाभ दिले, त्याचाच विस्तार महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने केला, असे त्यांनी सांगितले.

    सुरुवातीला महात्मा फुले योजनेतून फक्त दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत व्हायचे. त्याची मर्यादा 5 लाख केली आणि इतकेच नाही, तर आता महाराष्ट्रातली सर्वच्या सर्व म्हणजे 12 कोटी जनता महात्मा फुले योजनेच्या दायऱ्यात आणून जनतेला सर्व सहकारी रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्य सुविधा सुरू केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

    आपल्या भाषणात फडणवीसंनी महाआरोग्य शिबिराच्या वैशिष्ट्याचा आवर्जून उल्लेख केला. एकाच छताखाली सर्व रोगांशी आणि विकारांशी संबंधित डॉक्टर्स एकत्र करून साडेतीन लाख रुग्णांना त्यांच्या आवश्यकतेनुसार आरोग्याचा लाभ करून देणे, त्यांना मोफत उपचार मोफत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देणे हा विक्रम केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे विशेषत्वाने अभिनंदन केले. वाढदिवसानिमित्त आपण कधी पोस्टर्स लावली नाहीत. मोठे सोहळे साजरे केले नाहीत. त्यामुळे देवेंद्र सप्ताह या कार्यक्रमाला आपण येऊ शकत नाही, असे त्यांनी आयोजकांना कळविले होते. पण आयोजकांनी महाआरोग्य शिबिराचा उपक्रम सांगितल्यानंतर फडणवीस यांनी त्या उपक्रमासाठी आनंदाने होकार दिला. हे महाआरोग्य शिबिर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात झाले. परंतु या शिबिराला मराठवाड्यातून सुमारे साडेतीन लाख नोंदले गेले. यापैकी प्रत्येकाला गरजेनुसार मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध होणार आहेत. सुमारे साडेतीन लाख रुग्णांना याचा लाभ मिळणे हा विक्रम या निमित्ताने नोंदला गेला आहे.

    विरोधकांना मानसोपचाराची गरज; गिरीश भाऊ ती पूर्ण करा!!

    यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या विरोधकांना चिमटाही काढला. महाआरोग्य शिबिरात गिरीश महाजन यांनी वेगवेगळ्या विकारांवरचे तज्ञ डॉक्टर तर उपलब्ध ठेवले आहेतच, पण त्याचबरोबर मानसोपचार तज्ञांची ही उपलब्धता ठेवली आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्रात सध्या अनेकांना मानसोपचाराची गरज आहे. कारण त्यांना महाराष्ट्रात काही चांगले घडलेले दिसतच नाही किंवा पाहावत नाही. त्यामुळे अनेकांना पागलखान्यात ठेवण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर मानसोपचार करून त्यांना लवकर बरे करा, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना विनंती करताना विरोधकांना जोरदार टोला हाणला.

    Chhatrapati Sambhajinagar; As many as 3.5 lakh patients get free benefits from examination to surgery!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार