दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमुळेही येथे उद्योग क्षेत्रासाठी लागणारी एक संपूर्ण इको-सिस्टिम विकसित झाली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chhatrapati Sambhajinagar मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत छत्रपती संभाजीनगर येथे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (CMIA) आयोजित, ‘उद्योजक संवाद’ कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.Chhatrapati Sambhajinagar
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरचे उद्योग व उद्योजकांच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, येथे सर्वांना सोबत घेऊन जाण्याची एक चांगली परंपरा आहे. अनेकवेळा व्यवसाय करत असताना व्यक्ती स्वतःचा आणि स्वतःच्या व्यवसायाचा विचार अधिक करते मात्र छत्रपती संभाजीनगर येथे एक सामूहिक एकी व शक्ती दिसते, जी सातत्याने या शहराला इंडस्ट्रियल मॅग्नेट बनवण्याचे काम करते. याबाबतीत ‘सीएमआयए’सारखी संस्था एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता छत्रपती संभाजीनगर-जालना महाराष्ट्राचे नवे इंडस्ट्रियल मॅग्नेट आहे. ऑरिक सिटीमध्ये 10 हजार एकरावर इंडस्ट्रियल सिटी उभारण्यात आलेली आहे, आज तिथे एकही प्लॉट शिल्लक नाही. आणखी 8 हजार एकर जमीन लवकरच राज्य शासन अधिग्रहण करणार असून दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमुळेही येथे उद्योग क्षेत्रासाठी लागणारी एक संपूर्ण इको-सिस्टिम विकसित झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा याठिकाणी वाढत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर येथील उद्योग क्षेत्र या भागात संरक्षण क्षेत्रातील उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्य शासनही येथे स्वतंत्र संरक्षण उद्योग पार्क उभारणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात मुंबई, नागपूर, पुणे, अहिल्यानगर येथे डिफेन्स क्लस्टर सुरु झालेले आहे. या क्लस्टरमध्ये आधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती होत आहे. संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योगांमध्ये छत्रपती संभाजीनगरला अग्रस्थानी आणण्यासाठी राज्य शासन खंबीरपणे येथील उद्योग क्षेत्राच्या पाठीशी उभे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मंत्री जयकुमार रावल, मंत्री अतुल सावे, खा. भागवत कराड, ‘मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’चे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
Chhatrapati Sambhajinagar and Jalna is now the new industrial magnet of Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Anurag Thakur ‘भ्रष्टाचाराच्या मॉडेलचा हा एक नवा अध्याय आहे’, भाजपचा टोला!
- ”भ्रष्टाचार अन् काँग्रेस हे समानार्थी शब्द आहेत” नॅशनल हेराल्ड प्रकरणात छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव यांनी टोमणा मारला
- तिकडे पाकिस्तानचा लष्कर प्रमुख देतोय भारताला धमकी; इकडे RAW चे माजी प्रमुख करताहेत भारत – पाकिस्तान चर्चेची वकिली!!
- Terrorist Pasia : अमेरिकेत दहशतवादी पासियाला अटक; पंजाबमधील ग्रेनेड हल्ल्याचा मास्टरमाइंड, पाकिस्तानच्या ISI शी संबंध