• Download App
    क्रांतिदिनापासून छत्रपती संभाजीराजेंची परिवर्तन क्रांती, तुळजापुरातून होणार प्रारंभ|Chhatrapati Sambhaji Raj's transformation revolution will start from Tuljapur from Krantidan

    क्रांतिदिनापासून छत्रपती संभाजीराजेंची परिवर्तन क्रांती, तुळजापुरातून होणार प्रारंभ

    प्रतिनिधी

    कोल्हापूर : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात होणार, अशी घोषणा बुधवारी सकाळी ट्वीट करून केली. 9 ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी तुळजापूर येथे भेटू, असे त्यांनी म्हटले आहे.Chhatrapati Sambhaji Raj’s transformation revolution will start from Tuljapur from Krantidan

    काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. यामुळे मोठे वादंग निर्माण होऊन तुळजापूर शहर बंददेखील ठेवण्यात आले होते. यानंतर संभाजीराजे हे प्रथमच तुळजापूरला येत असून क्रांतिदिनी तुळजापूर येथून परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात करणार असल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे.



    खासदार म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे सांगितले होते. तर ‘स्वराज्य’ या संघटनेची स्थापना करणार असल्याचे जाहीर केले होते. गत राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजेंनी सर्वपक्षीयांचा पाठिंबा मागत अपक्ष उभे राहण्याची इ्छा व्यक्त केली होती. परंतु शिवसेनेने त्यांना साथ न देता दुसरा उमेदवार उभा केला.

    यावरून संभाजीराजेंनी नाराजी जाहीर करत उद्धव ठाकरेंवर टीकाही केली होती. यानंतरच आपण आता स्वत:च्या संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात सक्रिय जनसंपर्क वाढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. छत्रपती शिवरायांचे वंशज असलेले संभाजीराजे यांच्याबद्दल जनमानसात मोठे आकर्षण आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी कायम लावून धरलेला आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांनी याप्रकरणी तातडीने पावले उचलण्याचे आवाहनही नुकतेच केले होते.

    Chhatrapati Sambhaji Raj’s transformation revolution will start from Tuljapur from Krantidan

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा