• Download App
    छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक ; म्हणाले - मग आम्ही बांगड्या घालून बसलोय काय ?Chhatrapati Sambhaji Raje again aggressive; Said - So we are sitting wearing bangles?

    छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक ; म्हणाले – मग आम्ही बांगड्या घालून बसलोय काय ?

    सरकारच्या भूमिकेवर नाराज असलेल्या खासदार संभाजी राजे यांनी राज्य सरकारवर टीक करत आता मराठा आरक्षण प्रश्नी पुन्हा आपला आक्रमक पवित्रा घेतला आहे.Chatrapati Sambhaji Raje again aggressive; Said – So we are sitting wearing bangles?


    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. सध्या या प्रश्नावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांकडे टोलवाटोलवी करत आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर नाराज असलेल्या खासदार संभाजी राजे यांनी राज्य सरकारवर टीक करत आता मराठा आरक्षण प्रश्नी पुन्हा आपला आक्रमक पवित्रा घेतला आहे.

    काल सोलापुरात संभाजीराजेंची जनसंवाद यात्रा होती.त्यावेळी संभाजीराजेंना मॅनेज केलं की विषय संपला असं म्हणणाऱ्यांना तसेच महाधिवक्ता कुंभकोणी यांनाही संभाजीराजेंनी चांगलच सुनावलंय.



    पुढे छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, आमच्या इतक्या सोप्या मागण्या आहेत, ज्या पूर्ण केल्या जात नाहीयेत मग आम्ही बांगड्या घालून बसलोय काय ?संभाजीराजेंना मॅनेज केलं की विषय संपला असं काही जणांना वाटत असेल पण माझा जन्म छत्रपती घराण्यात झालाय, मॅनेज शब्द आमच्या जवळपास ही नाही.

    आम्ही मूक आंदोलन केलं, शांतपणे चर्चा केली पण तुम्हाला काही फरक पडत नाही, आता संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहोत. यापुढे आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील आता भेटणार नाही, आमचे समन्वयकही भेटणार नाहीत.अस देखील संभाजीराजे म्हणाले.

    Chatrapati Sambhaji Raje again aggressive; Said – So we are sitting wearing bangles?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!