• Download App
    बोलतो म्हणून अडीच वर्षे जेलमध्ये ठेवले, आज तेरा वक्त है कल मेरा आयेंगा म्हणत छगन भुजबळ यांचा भाजपला इशारा|Chhagan Bhujbal's warning to BJP saying that today is your time, tomorrow is my time

    बोलतो म्हणून अडीच वर्षे जेलमध्ये ठेवले, आज तेरा वक्त है कल मेरा आयेंगा म्हणत छगन भुजबळ यांचा भाजपला इशारा

    विशेष प्रतिनिधी

    नांदेड : अडीच वर्षे मला जेलमध्ये ठेवलं कारण मी बोलतो म्हणून, पण आता ही गप्प राहणार नाही. बोलतच जाणार आहे. आज महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास दिला जातो. आज तुमची वेळ आहे. उद्या आमची येईल, असा इशारा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.Chhagan Bhujbal’s warning to BJP saying that today is your time, tomorrow is my time

    देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात शायरी करत भाजपाला इशारा देत भुजबळ म्हणाले, ये वक्त है बदल जाता है. आज तेरा वक्त है. कल मेरा आयेंगा. हम ना बदलेंगे. वक्त के रफतार के साथ जब भी मिलेंगे रफतार वही होगी.



    किरीट सोमया नांदेडला येणार आहे, पण कशासाठी येताय, अरे मुबंईला बसून आरोप करा. पण त्यापूर्वी भाजपाचं सरकार असताना तुमच्या नेत्यांनी केलेल्या घोटाळ्याचं काय झालं ते बघा, असं म्हणत भाजपा सरकारमध्ये असताना किती घोटाळे झाले याची यादीच भुजबळ यांनी सभेत वाचून दाखवली.

    भाजप नेत्यांच्या घोटाळ्याबद्दल सोमया का बोलत नाही, असा सवाल करत भुजबळ म्हणाले, अजित पवार यांनी आज भाजप संबंधित साखर कारखान्याची यादी दिली. सोमय्या तिकडे जा की.महाविकास आघाडीच सरकार पाडण्यासाठी त्रास दिला जातोय. अजित पवार यांच्या तीन बहिणीच्या घरावर छापे टाकले हे सगळं तोंड बंद करण्यासाठी चालले आहे.

    Chhagan Bhujbal’s warning to BJP saying that today is your time, tomorrow is my time

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा