• Download App
    मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर केमिकल टँकर उलटल्याने भीषण दुर्घटना; चौघांचा मृत्यू, तीन जण जखमी Chemical tanker overturns on Mumbai Pune expressway 4 dead  3 injured

    मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर केमिकल टँकर उलटल्याने भीषण दुर्घटना; चौघांचा मृत्यू, तीन जण जखमी

    महामार्गावर आगीचे लोट आणि केमिकल पसरले होते;  उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला शोक व्यक्त

    विशेष प्रतिनिधी

    लोणावळा :  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणे दिवसेंदिवस जिकरीचे होत चालले आहे. कारण, या महामार्गावरील अपघातांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच या महामार्गावरून प्रवास करावा लागतो. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास या महामार्गावर भीषण दुर्घटना घडली,  ज्यामध्ये चार जणांचा  मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. Chemical tanker overturns on Mumbai Pune expressway 4 dead  3 injured

    या महामार्गावरून जाणारे एक केमिकल टँकर रस्त्यावर उलटला आणि त्याला भीषण आग लागली. परिणामी महामार्गावर आगीचे लोट पसरले ही घटना लोणावळा ते खंडाळा दरम्यान असलेल्या कोणेगाव पुलाजवळ घडली. टँकरमधील केमिकल खालून जाणाऱ्या मार्गावरही पसरले. जे खालील मार्गावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर पडले आणि तेही या आगीत होरपळले.

    फडणवीसांनी  शोक व्यक्त  केला –

    यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘’मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत तीन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राज्य पोलिस दल, महामार्ग पोलिस, आयएनएस शिवाजी, अग्निशमन दल अशा सर्व यंत्रणा घटनास्थळी असून आता आग आटोक्यात आली आहे. एका बाजूने वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून, दुसराही मार्ग लवकरच सुरू होईल. राज्य सरकार स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे.’’ असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

    Chemical tanker overturns on Mumbai Pune expressway 4 dead  3 injured

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!