• Download App
    Chembur चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना! स्कूल बसवर मोठे झाड उन्मळून पडले, 4 विद्यार्थी जखमी; 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

    Chembur : चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना! स्कूल बसवर मोठे झाड उन्मळून पडले, 4 विद्यार्थी जखमी; 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

    Chembur

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Chembur मुंबईतील चेंबूर परिसरात आज दुपारी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील ११ नंबर रोडवर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी स्कूल बसवर रस्त्याच्या कडेला असलेले एक अवाढव्य झाड अचानक उन्मळून कोसळले. या दुर्दैवी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, ४ शाळकरी मुले गंभीर जखमी झाली आहेत.Chembur

    प्राथमिक माहितीनुसार, ही घटना आज दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान घडली. शाळा सुटल्यानंतर ही खाजगी स्कूल बस नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी चेंबूरच्या ११ नंबर रोडवरून जात होती. याच दरम्यान रस्त्याशेजारी असलेले एक जुने आणि अवाढव्य झाड अचानक धावत्या बसवर उन्मळून पडले. झाडाच्या मोठमोठ्या आणि जड फांद्या थेट बसच्या छतावर आदळल्या. यामुळे बसचा समोरील आणि मधला हिस्सा मोठ्या प्रमाणावर चपला गेला. झाड कोसळताच बसच्या आत निष्पाप चिमुरड्यांचा एकच आक्रोश आणि किंचाळ्या ऐकायला आल्या.Chembur



    ४ बालक जखमी, १ विद्यार्थिनीचा मृत्यू

    अपघातावेळी बसमध्ये एकूण १२ विद्यार्थी प्रवास करत होते. झाड कोसळल्यानंतर बसचे मोठे नुकसान झाले आणि काही विद्यार्थी आत अडकून पडले. मात्र, मदत पथके पोहोचण्यापूर्वीच बसचे चालक, वाहक आणि परिसरातील नागरिकांनी धाव घेत विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी संयुक्तपणे बचावकार्य पूर्ण करून सर्व १२ विद्यार्थ्यांना बाहेर काढले.

    ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

    अपघातानंतर जखमी झालेल्या पाच विद्यार्थ्यांना तातडीने चेंबूरमधील झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी चार विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

    मात्र, विहान श्रीवास्तव (वय ११) या विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळी ४.२३ वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले.

    प्रशासनाकडून सर्वोच्च प्राधान्य

    घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली आहे. कटरच्या सहाय्याने झाडाच्या अवजड फांद्या कापण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बसमध्ये अडकलेल्या त्या एका विद्यार्थ्याला सुखरूप आणि सुरक्षित बाहेर काढण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

    झाड उन्मळून पडण्यामागचे कारण काय?

    या दुर्घटनेनंतर महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे. झाड नेमके कोणत्या कारणामुळे उन्मळून पडले, याचा शोध घेतला जात आहे.

    अलीकडील पावसामुळे जमिनीत निर्माण झालेली सैल माती, जोरदार वारे किंवा झाडाची आधीपासूनची खराब अवस्था यापैकी कोणते कारण या दुर्घटनेला कारणीभूत ठरले का, याची तपासणी केली जाणार आहे.

    घटना दुर्दैवी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार – महापौर तावडे

    घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे या घटनास्थळी दाखल झाल्या. त्या म्हणाल्या, “अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. भलमोठे पिंपळाचे झाड शाळेची बस येत असताना कोसळले. पोलिस यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेत आहे. बसमध्ये जवळपास १३ मुले होती. त्यातील एका बाळाचा मृत्यू झालेला आहे. मला या गोष्टीचे खूप वाईट वाटत आहे. या घटनेचा आढावा मी घेणार आहे.”

    “या घटनेकडे आम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही. ही घटना कशी घडली? हे झाड का उन्मळून पडले? किती वर्षे जुने होते? याची माहिती घेणार आहे. मुंबईतील जी झाडे ३०-४० वर्षे जुनी आहेत, त्यांचे ऑडिट करा. म्हणजे ती झाडे पावसाळ्यात तग धरतील का? हे आपल्याला कळेल. त्याचे सर्वेक्षण करा, हे मी पावसाळ्यापूर्वीच्या मीटिंगमध्ये आणि त्यानंतर पण वारंवार बोलत होते. पुन्हा अशी घटना होणार नाही, यासाठी आम्ही काळजी घेऊ,” असे रितू तावडे म्हणाल्या.

    “मला असे कळले की, इकडच्या लोकांनी पत्रे दिले होती की, हे झाड डेंजर झोनमध्ये आहे, तर याला काढून टाका. मी ही माहिती काढणार आहे. ती पत्रे जर माझ्या हाताला लागती, तर अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा केला असेल, तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होणार,” असेही महापौर रितू तावडे यांनी म्हटले.

    Tragic Accident in Chembur: Tree Collapses on School Bus, 11-Year-Old Student Dies

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dhananjay Munde : रोज 16 तास काम, नकार दिला की इलेक्ट्रिक शॉक! म्यानमारच्या छळछावणीत महाराष्ट्राचे तरुण ओलीस, सुटकेसाठी धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    Devendra Fadnavis : बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कायदे करणार; देवेंद्र फडणवीस म्हणाले- गुन्हेगारी वय 18 वरून 16 वर्षे करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू

    CM Eknath Shinde : ‘मी जे करतो ते फुल प्रूफ करतो!’ सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशावर एकनाथ शिंदेंची फटकेबाजी, उद्धव ठाकरेंवरही निशाणा