वृत्तसंस्था
पुणे : कोरोनामुळे खाद्यतेलाचे दर वाढले होते. परंतु, आता जागतिक बाजारपेठेसह स्थानिक बाजारपेठेत तेलाची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात मोठी घट झाली. घाऊक बाजारात महिन्यात १५ लिटरच्या खाद्यतेलाच्या डब्यामागे ३०० ते ३५० रुपयांची, तर किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट झाली आहे. Cheaper edible oil at Rs 350. Consequences of declining demand
देशात तेल बियांचे उत्पादन मोठे झाले आहे. तसेच आता सोयाबीन आणि तेल बियांचा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे देशासह इतर देशांतील खाद्यतेल डब्यामागे ३५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. काही व्यापाऱ्यांनी साठवलेले तेल विक्रीस काढले आहे. त्यामुळे आवक सुरू झाली. पण, मागणी घटल्याने तेलाचे दर घसरले आहेत.
दुसरीकडे बाजारात शेंगदाणा तेलाचे दर मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. शेंगदाणा तेलाचे उत्पादन राज्यातच होते. सूर्यफूल आणि पाम तेलाचेही उत्पादन काही प्रमाणात राज्यातच होते. मात्र सोयाबीन तेलाची इतर देशातून आयात करावी लागते, असे रायकुमार नहार यांनी सांगितले.
बाजारपेठेत खाद्यतेलाचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे दरात वाढ झाली होती. आता आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घट झाली आहे.
मात्र यापुढे खाद्यतेलाच्या दरात घट होईल, अशी परिस्थिती नाही. त्यामुळे हेच दर काही दिवस टिकून राहतील, असे व्यापारी रायकुमार नहार यांनी सांगितले. सर्वत्र चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे खाद्यतेलाला मागणीही चांगली असल्याचे उदय चौधरी यांनी सांगितले.
येथून होते तेलाची आवक….
शेंगदाणा : गुजरात, कर्नाटक,
आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र
सूर्यफूल : रशिया, युक्रेन
सोयाबीन : अर्जेंटिना, ब्राझील
पामतेल: मलेशिया, इंडोनेशिया, स्वित्झर्लंड
भारतात दरवर्षी ७० टक्के खाद्यतेलाची आयात केली जाते आणि केवळ ३० टक्के निर्मिती केली जाते. त्यामुळे खाद्यतेलांच्या दरवाढीवर मोठा परिणाम झाला आहे. परंतु, आता आवक वाढल्याने दरात घट झाली आहे.
– रायकुमार नहार, व्यापारी मार्केट यार्ड
शहरातील हॉटेल खाणावळी, विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून पाम तेलाला मागणी असते. तर घरगुती ग्राहकांकडून सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाला मागणी असते.
उदय चौधरी, किराणा व्यापारी, मार्केट यार्ड
Cheaper edible oil at Rs 350. Consequences of declining demand
महत्वाच्या बातम्या
- घरपोच दारू मागविताना शबाना आझमी यांची झाली फसवणूक
- ओबीसी आरक्षणावरून नणंद- भावजयांत जुंपली, रोहिणी आणि रक्षा खडसे आमने-सामने
- वाकायला सांगितले, ते गुडघ्यावर बसले…!! हिमालयाच्या मदतीला गेलेले सह्याद्रीही अपवाद नव्हते…!!
- नेहरू – पटेलांचे नाव घेत मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्लांचा ५ ऑगस्ट २०१९ पूर्वीचाच सूर; ३७० कलमासाठी संघर्ष करण्याची मांडली भूमिका