• Download App
    सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, सुधीर मुनगंटीवार यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका|Cheap liquor, expensive oil, Sudhir Mungantiwar criticizes Mahavikas Aghadi government

    सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, सुधीर मुनगंटीवार यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाविकास आघाडी सरकार म्हणजे तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशी या सरकारची नीती आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. दारूवरील कर कमी केल्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.Cheap liquor, expensive oil, Sudhir Mungantiwar criticizes Mahavikas Aghadi government

    मुनगंटीवार म्हणाले, दारू स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांचा हा निर्णय हर्बल वनस्पतीवाल्यांसाठी आणि क्रुझ पाटीर्वाल्यांसाठी समर्पित आहे. सरकार पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करत नाही. दारूचे पण भाव कमी करून बेवड्यांना ऊर्जा देण्याचं काम हे सरकार करत आहे.



    जनतेच्या आशिर्वादाने लोकशाही मार्गाने सरकार निवडून येतात. त्या सरकारचा प्रत्येक निर्णय शेतकऱ्यांना समर्पित असतो. शोषित समाजाला समर्पित असतो. वंचित समाजाला समर्पित असतो. गोरगरिबांना समर्पित असतो. शेतमजुरांना समर्पित असतो. पण बेइमानीच्या आधारावर हे सरकार स्थापन झालेले आहे. जनतेने निवडून दिलेलं हे सरकार नाही.

    महाराष्ट्र सरकारने आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी इतर राज्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ५० टक्क्यांनी कमी केले आहेत. आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी, खर्चाच्या ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणण्यात आली आहे.

    आयात केलेल्या विदेशी मद्याच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वर्षाला १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीमुळे सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे कारण यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढेल.

    Cheap liquor, expensive oil, Sudhir Mungantiwar criticizes Mahavikas Aghadi government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!