विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांविषयी महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी वाद निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मधील वाघनखे छत्रपती शिवरायांचीच असल्याचा स्पष्ट निर्वाळा पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी ऐतिहासिक पुराव्यांसह दिला आहे. ही वाघनखे लंडनच्या संग्रहालयातून भारतात आणावीत त्यासाठी त्यांनी 1971 पासून पाठपुरावा केला होता. त्याची सविस्तर माहिती त्यांनी खास मुलाखतीत दिली आहे. त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्राचे प्रख्यात कवी राम गणेश गडकरी यांच्या एका ऐतिहासिक कवितेचाही संदर्भ दिला आहे.Chatrapati Shivaraya’s tiger in London museum!!; Dr. Nirwala of Pratap Singh Jadhav with historical evidence
1969 मध्ये पुढारी वृत्तपत्राची सर्व सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रतापसिंह जाधव यांनी छत्रपती शिवरायांच्या वस्तूंच्या संग्रहाबाबत लंडनच्या संग्रहालयाशी झालेल्या पत्रव्यवहारा संदर्भात पुढारीत लेख लिहिल्याची आठवण सांगितली.
1971 मध्ये वि. ह. कोडोलीकर यांना ते पत्र आले होते, तसेच काशीराम रत्नसावंत तथा तात्यासाहेब देसाई यांनी हे पत्र आपल्याकडे दिले होते. त्यांनी लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमशी अनेक वर्षे पत्र व्यवहार केला होता. स्वतः देसाई यांनी त्यावेळी पुढारीत या पत्रव्यवहारासंदर्भात सविस्तर लेख लिहिला होता. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमचे ते 11 डिसेंबर 1931 चे पत्र होते, ज्यामध्ये संग्रहालयाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचा देखील उल्लेख केला होता.
हे पत्र पाहिल्यानंतर आपण स्वतः 1971 मध्ये व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमशी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी आपल्याला उत्तर पाठविले होते. त्या पत्रोत्तराबरोबरच त्यांनी दोन फोटो पाठविले होते. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या तलवारीचा उल्लेख होता. ती शिवाजी महाराजांची तलवार होती, पण त्यात “भवानी तलवार” असा उल्लेख नव्हता. पण याच पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वधाच्या वेळी वापरलेल्या वाघनखांचा स्पष्ट उल्लेख म्युझियमच्या अधिकाऱ्यांनी केला होता.
ही वाघनखे व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या इंडिया सेक्शन मध्ये रूम नंबर 7, फ्रेम नंबर 709 मध्ये आहेत, असा स्पष्ट उल्लेख त्या पत्रात होता.
1931 मध्ये आलेले पत्र आणि 1971 मध्ये आलेले पत्र यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे स्पष्ट उल्लेख असताना त्या संदर्भात कोणता वादही उद्भवू शकत नाही. आपण त्यावर पुढारी मध्ये अग्रलेख लिहिला होता. त्यावेळी वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक वस्तू लंडनच्या संग्रहालयात आहे महाराष्ट्र सरकारने त्या परत आणाव्यात असे आवाहन त्या अग्रलेखात मी केले होते. त्यानंतर काही वर्षांनी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांनी आपल्याकडून सर्व पत्रव्यवहार मागवून घेतला होता. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तू लंडनच्या म्युझियम मधून आणण्यासाठी महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न केले होते, याची आठवणही प्रतापसिंह जाधव यांनी सांगितली.
त्याचवेळी प्रतापसिंह जाधव यांनी महाराष्ट्राचे लाडके कवी राम गणेश गडकरी यांच्या एका कवितेचा उल्लेख केला. लोकमान्य टिळक चिरोल केस संदर्भात ज्यावेळी लंडनला गेले होते, त्यावेळी त्यांना निरोप देताना राम गणेश गडकरींनी एक कविता लिहिली होती. त्या कवितेत त्यांनी
*”न लगे दौलत न लगे बरकत
न लगे कोहिनूर
स्वदेश नल गे स्वराज्य न लगे
होवो सर्वही चूर
पण एक सांगणे एक मागणी
तीच लाखवार
मागून घ्यावी
श्री शिवबाची भवानी तलवार!!”*
असे लिहिले होते.
राम गणेश गडकरींच्या या काव्याचा उल्लेख करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवार वाघनखांविषयी महाराष्ट्राला किती मनापासून लगाव आहे, हेच प्रताप सिंह जाधव यांनी अधोरेखित केले.
त्याचवेळी प्रतापसिंह जाधव यांनी महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय नेत्यांना विनंती केली. आपला कोणताही अभ्यास नसताना केवळ टीव्हीवर दिसावे म्हणून कोणताही अनावश्यक वक्तव्य करून वाद निर्माण करू नये. अभ्यास केल्याशिवाय कोणी बोलू नये, असे ते म्हणाले.
प्रतापसिंह जाधव यांनी सुधीर मुनगंटीवार यांनाही आवाहन केले, की त्यांनी लंडन मधली सर्व वस्तुसंग्रहालय बघावीत. तिथे शोध घ्यावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांच्या जेवढ्या वस्तू तिथे आहेत, त्या सर्व आणून महाराष्ट्रात त्याचे मोठे वस्तुसंग्रहालय उभारावे!!
Chatrapati Shivaraya’s tiger in London museum!!; Dr. Nirwala of Pratap Singh Jadhav with historical evidence
महत्वाच्या बातम्या
- न्यूजक्लिकप्रकरणी प्रबीर-अमित यांच्या याचिकेवर HCचा निर्णय राखीव; UAPA अंतर्गत झाली अटक
- WATCH : चीननेच घडवली अतिरेकी निज्जरची हत्या, अमेरिकेतील मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दाव्याने खळबळ
- छत्तीसगडसाठी भाजपने जाहीर केली उमेदवारांची दुसरी यादी; तीन खासदारांना तिकीट
- परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, सप्तश्रृंगी गडासाठी शिंदे – फडणवीस सरकारचा 531 कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा!!