विशेष प्रतिनिधी
पुणे : ‘हर हर महादेव’ च्या जयघोषात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने निर्बंध शिथील केले आहेत. पहाटेच्या दर्शनाला जास्त गर्दी दिसली. रात्री १२ वाजता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते शासकीय पूजा केली. Chanting of ‘Har Har Mahadev’ at Bhimashankar; Crowd of devotees for darshan on the occasion of Mahashivaratri
मध्यरात्री बारा वाजल्यापासून भाविकांची रांग लागली होती. पूजा झाल्यानंत यात्रेला व दर्शनाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, देवस्थानचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे यांच्या उपस्थितीत पूजा पार पडली. देवस्थानचे विश्वस्त मधुकर गवांदे, संजय गवांदे, पुरूषोत्तम गवांदे गुरूजी, मयुर कोडिलकर, आशिष कोडिलकर यांच्या वेदपठनात तसेच दत्तात्रय कौदरे, चंद्रकांत कौदरे, माऊली शिर्के इत्यादी गुरव मंडळींच्या उपस्थितीत शासकिय पूजा झाली. यावेळी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. महाशिवरात्र यात्रेनिमित्त भीमाशंकर देवस्थान टस्ट, पोलिस विभाग यांनी तयारी केली.
Chanting of ‘Har Har Mahadev’ at Bhimashankar; Crowd of devotees for darshan on the occasion of Mahashivaratri
महत्त्वाच्या बातम्या
- मुला-मुलींच्या शाळेसाठी जागा ‘बार्टी’च्या ताब्यात देण्याचे आदेश
- कोविड वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून मानवांमध्ये; अमेरिकेतील अॅरिझोना विद्यापीठाचा निष्कर्ष
- व्यावसायिक सिलेंडर १०५ रुपयांनी वाढला, घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे; सामान्यांना दिलासा
- हाँगकाँग मध्ये कोरोनामुळे आठवड्यात ३०० मृत्यू रुग्णालये रुग्ण आणि मृतदेहांनी भरली