प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक नेत्यांना एकीकडे मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली असतानाच, दुसरीकडे शरद पवारांनी भाकरी फिरवण्याची चर्चा सुरू केली. ती आमदार रोहित पवारांच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदापर्यंत आलीच. पण आता त्यापुढे ती प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालीपर्यंत येऊन ठेपली आहे. त्यामुळे अनेक नेते गॅसवर गेले आहेत. Change of guard in NCP offing after sharad Pawar hinted the change for youngsters
जयंत पाटील हे तब्बल 5 वर्षे प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत. अजितदादांच्या बरोबरीने त्यांचीही मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा उफाळून आली आहे. या महत्त्वाकांक्षी नेत्यांना वेळीच लगाम घालण्याच्या दृष्टिकोनातून शरद पवारांनी भाकरी फिरवण्याची भाषा वापरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
काही नेते वर्षानुवर्षे एकाच पदाला चिकटून असल्यामुळे इतरांना संधी मिळत नसल्याची तक्रार अनेकजण करू लागले आहेत. पक्षांतर्गत सुरू असलेल्या या कुरबुरींनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाराजीचे स्वरूप धारण करू नये, यासाठी शरद पवार स्वतः सक्रिय झाले असून, त्यांनी भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यातून अनेकांचे पंख कापून काहींच्या पंखात बळ भरण्याचा पवारांचा मनसूबा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. परंतु, अजित पवार यांची पक्षावरील पकड पाहता, त्यांच्या गटातील नेत्यालाच यावेळी संधी मिळेल, असे चित्र आहे. सध्या राजेश टोपे, धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे यांची नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. त्यात राजेश टोपे यांचे पारडे जड मानले जात आहे. आरोग्यमंत्री म्हणून कोरोनाकाळ त्यांनी केलेले काम राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. त्यामुळे त्यांना संधी दिल्यास ते सर्वमान्य नेतृत्त्व म्हणून पुढे
धनंजय मुंडे यांना देखील तरुण नेतृत्व म्हणून राष्ट्रवादीत मान आहे. विधिमंडळ सभागृहात, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभांमध्ये धडाडणारी तोफ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांचाही विचार केला जाऊ शकतो, असे कळते. शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा पाच वर्षांपूर्वी जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाले त्यावेळी सुद्धा होती. मात्र, काही कारणाने त्यांचे नाव मागे पडले. पश्चिम महाराष्ट्रातील चेहरा म्हणून त्यांचा नावाचा विचार होऊ शकतो, असे राष्ट्रवादीतील काहींचे म्हणणे आहे.
Change of guard in NCP offing after sharad Pawar hinted the change for youngsters
महत्वाच्या बातम्या
- गव्हाच्या बंपर खरेदीमुळे सरकारची चिंता मिटली; आतापर्यंत १९५ लाख टन खरेदी, गेल्या वर्षीचा विक्रम मोडला!
- पीएम मोदींवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर खरगेंची सारवासारव, म्हणाले- कोणी दुखावले असल्यास खेद व्यक्त करेन
- Delhi excise case : मनीष सिसोदियांना न्यायालयाकडून मोठा झटका! न्यायालयीन कोठडीत केली वाढ
- आणखी एक राजकीय भूकंपाची चाहुल, ठाकरे गटाचे सर्व 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात- उदय सामंत