• Download App
    ओबीसींना आरक्षण मिळू नये हे महाविकास आघाडीचे षडयंत्र, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप|Chandrasekhar Bavankule alleges conspiracy of Mahavikas Aghadi that OBCs should not get reservation

    ओबीसींना आरक्षण मिळू नये हे महाविकास आघाडीचे षडयंत्र, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : ओबीसींना आरक्षण मिळू नये हे महाविकास आघाडी सरकारचे षडयंत्र आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने आठ महिने टाईमपास केला. मंत्रिमंडळातील एकही नेत्याने ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न केले नाही. ते फक्त राज्यभर मेळावे करत राहिले, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे Chandrasekhar Bavankule alleges conspiracy of Mahavikas Aghadi that OBCs should not get reservation

    बावकुळे म्हणाले, राज्य सरकारने ओबीसी समाजाची दिशाभुल केली असून, त्यांना फसवले आहे. सुरूवातीला ओबीसी आयोगाची स्थापना केली, मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा निधी देण्यात आला नाही. हे जाणून बुजून राज्य सरकारने केले असल्याचे बावनकुळे म्हणाले.



    राज्य सरकारला खरंच ओबीसी समाजाची चिंता असेल, तर त्यांनी 04 मार्च 2021 च्या आदेशाप्रमाणे एका महिन्यांच्या आत डेटा तयार करावा. तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नये. त्यासाठी निवडणूक आयोगाला विनंती करावी.

    महिन्याभराच्या आत डेटा तयार करतो असे सांगितले असते तर सर्वोच्च न्यायालयााने आरक्षण दिले असते. मात्र ते राज्य सरकारने केले नाही. ओबीसी समाजाला राज्य सरकारने फसवले. या सरकारच्या मंत्र्याना मी सोडणार नाही. महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू, असा इशारा बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

    Chandrasekhar Bavankule alleges conspiracy of Mahavikas Aghadi that OBCs should not get reservation

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !