प्रतिनिधी
नाशिक : संभाजी भिडे गुरुजींना ठोकायच्या नादात छगन भुजबळांनी आधी ब्राह्मण समाजाला डिवचले, पण प्रकरण अंगाशी आल्यावर आता त्यांनी ब्राह्मण समाजाला चुचकारले आहे. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे ठेवत नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य करून छगन भुजबळ यांनी केले होते. त्यावरून भुजबळ यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यामुळे भुजबळ यांना आज खुलासा करावा लागला आहे. माझा विरोध ब्राह्मणांना नाही. मी ब्राह्मण समाजाचा अपमान केला नाही, असे स्पष्टीकरण आज छगन भुजबळ यांनी दिले. Chagan bhujbal trying to cover up brahminical names controversy
छगन भुजबळ म्हणाले, महात्मा फुले, सावित्रीबाई, शाहू महाराजांनी आपल्याला शिक्षण दिले. डॉ. आंबेडकर यांनी कायद्यात त्याचे रूपांतर केले. पण कुणाला सरस्वती, शारदा आवडते. आम्ही त्यांना कधी पाहिले नाही. त्यांनी शिक्षण दिले नाही. ज्यांनी शिक्षण दिले ते तुमचे-आमचे देव असले पाहिजेत. यात कोणत्याही समाजाचा अपमान होत नाही. मी आता सरकारमध्ये असलो तरी माझी भूमिका बदलणार नाही.
महात्मा फुलेंना भिडेंनीच वाडा दिला
छगन भुजबळ म्हणाले, ब्राह्मण वर्गातही पूर्वी फक्त पुरुषांनाच शिक्षणाचा अधिकार होता. महिलांना शिक्षण दिले जात नव्हते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी त्यांच्यासाठी शाळा काढल्या. या शाळा काढण्यासाठी महात्मा फुले यांना भिडे यांनीच वाडा दिला होता. शाळांसाठी तेव्हा चिपळूणकर, अण्णासाहेब कर्वे यांनी मदत केली होती. हे सर्व ब्राह्मण समाजाचे होते. केवळ या कारणावरून त्यांना माझा विरोध असण्याचे काहीच कारण नाही.
आमच्याही घरात हिंदू देवी, देवता
छगन भुजबळ म्हणाले, सरस्वती, लक्ष्मी या देवींनी आम्हाला शिक्षण दिलेले नाही. आम्हाला महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण दिले. ते आमचे दैवत आहेत. पण, मी हिंदू देवांचा अनादर करतो असे काही नाही. आमच्याही घरात भवानी माता, सप्तश्रृंगी माता, खंडोबा, ज्योतिबा हे देव आहेत.
भिडेंनी नाव का बदलले?
छगन भुजबळ म्हणाले, संभाजी भिडेंचे नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही? हे स्पष्ट करा ना. मनोहर आहे तरी त्याला संभाजी नावाची आवश्यकता का भासली? संभाजी हे नाव घ्यायच आणि बहूजन समाजात जायच. त्यानंतर ते काय बोलतात, काय विचार मांडतात? हे बरोबर नाही.
वडेट्टीवारांचे टीकास्त्र
भुजबळ बोलले ती वस्तुस्थिती आहे. ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहतील, शब्द फिरवणार नाहीत वा मागे घेणार नसतील तर त्यांना खरे भुजबळ म्हणावे लागेल. नाहीतर बळ गेलेली भुजा असे म्हणावे लागेल, असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
Chagan bhujbal trying to cover up brahminical names controversy
महत्वाच्या बातम्या
- लडाखमध्ये भीषण रस्ते अपघात, 9 सैनिक ठार; एक जखमी, कियारी शहराजवळ लष्कराचे वाहन खड्ड्यात पडले
- द फोकस एक्सप्लेनर : ई-रूपी म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा? हे UPI पेक्षा किती वेगळे, वाचा सविस्तर
- द फोकस एक्सप्लेनर : भाजपच्या पसमांदाच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसची रणनीती, काय आहे ‘जय जवाहर-जय भीम’ फॉर्म्युला?
- इम्रान खान यांना आणखी एक मोठा धक्का, सर्वात जवळचे नेते शाह मेहमूद कुरेशी यांनाही अटक!