प्रतिनिधी
जालना : कोण कोणाचं खातो??, या विषयावर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात जबरदस्त जुंपली आहे. मी स्व कष्टाचा खातो तुझ्यासारखं सासर्याच्या घरचे तुकडे नाही मोडत!!, अशा परखड शब्दांमध्ये छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांचा समाचार घेतला. Chagan bhujbal criticized manoj jarange patil over his demand of maratha reservation from obc quota
मनोज जरांगे पाटलांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेतेही आज त्यांच्याच जालना जिल्ह्यात एकवटले आणि अंबड मध्ये त्यांनी ओबीसी एल्गार परिषद घेतली. यायलागार परिषदेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर सडकून टीका केली. मनोज जरांगे यांनी केलेल्या टीकेला देखील भुजबळांनी आज प्रत्युत्तर दिले.
छगन भुजबळ म्हणाले :
आमची लेकरंबाळं, आमची लेकरंबाळं… मग बाकीच्यांची लेकरंबाळं नाहीत का रे बाबा… भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला तुरुंगात, हो आलो. अरे छगन भुजबळ दिवाळीतही बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो. पण स्व कष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही.
बीडच्या सभेत छगन भुजबळ फुटले; शरद पवारांवर धुवाँधार बरसले!!
आरक्षणाच्या मुद्द्यावर इंद्रा साहनी केस झाली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं प्रत्येक राज्याचा आयोग निर्माण करायचा आणि त्या माध्यमातून आरक्षण द्यायचं. 16 नोव्हेंबर 1992 ला हे अधिकार राज्य आणि केंद्राकडून काढून घेतले. त्यानंतर ते आयोगाकडे गेले. मराठा आरक्षणासाठी त्यावेळीही आंदोलने झाले. खत्री आयोगापासून अनेक आयोगांनी सांगितलं आरक्षण देता येणार नाही. आमचा काय दोष आहे?? आम्ही काय केलं?? आम्हाला तर राज्यघटनेनं आरक्षण दिलं. बाबासाहेबांनी दिलं. मंडल आयोगाने दिलं. 9 न्यायाधीशांनी त्यावर शिक्का मारला. जरांगे ना यातलं काहीच माहिती नाही.
हे आरक्षण गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. आज 75 वर्ष झाली. दलित समाजाला संविधानाने आरक्षण दिलं. एसपी झाले, कलेक्टर झाले, आयएएस झाले… पण आजही या झोपडपट्ट्यातून आमचे गोरगरीब दलित बांधव राहतो. गरीबी दूर झाली नाही. ओबीसींचीही गरीबी दूर झाली नाही. हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. जे वर्षानुवर्ष पिचलेले आहेत. दबलेले आहेत. त्यांना वर आणण्यासाठी दिलेलं हे आरक्षण आहे. हे आरक्षण म्हणजे काय आहे हे तर समजून घ्या.
सुरुवातीला २५० जाती होत्या. आता ३७५ हून अधिक जाती होत्या. आयोगाकडे गेले आणि आयोगाने म्हटलं घ्या. आम्ही घेतलं. नकार दिला नाही. तुम्ही या पण कायद्याने या. दादागिरी करू नका. मराठा समाजाला काही मिळत नाही असं आहे का? चंद्रकांत पाटील समिती आणि इतरांनी दिलेला रिपोर्ट पाहा. मराठ्यांच्या योजनांसाठी कोट्यवधी रुपये वाटण्यात आले आहेत.
मोदींनी 10 % दिलेल्या आर्थिक मागास आरक्षणात 85 % मराठा समाजाचे लोक आहेत. 60 % च्यावर 40% आरक्षणात मराठा आहे. आमच्या 27 % कुणबीही आहे. तुम्हाला नाही असं नाही. मराठा विद्यार्थ्याला वस्तीगृह नसेल तर 6000 रुपये मिळतात. तो निधी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळत नाही. 10 ते 11 हजार कोटी मराठा समाजाला वाटले आहेत. ओबीसी महामंडळ आधीपासून आहे. त्याला 1000 कोटीही दिले नाही. द्या हिशोब. तुम्हाला हवंय घ्या. पण आमचं काय? द्या ना आम्हाला!!
Chagan bhujbal criticized manoj jarange patil over his demand of maratha reservation from obc quota
महत्वाच्या बातम्या
- मराठा नेत्यांचा लढा जरांगेंच्या आडून; पण प्रस्थापित ओबीसी नेते लढत आहेत पुढून!!
- मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी वाद, प्रकरणाची सुनावणी पूर्ण; शाही ईदगाहच्या सर्वेक्षणासह सर्व १६ याचिकांवरील निर्णय राखीव
- Air India : एअर इंडियाच्या ३७ वर्षीय वैमानिकाचा दिल्ली विमानतळावरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- भाऊबीजेनिमित्त प्रसाद ओकने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट!
- लोकसभेच्या जागा वाटपात ठाकरे – पवार परस्पर राजी; पण काँग्रेस पंक्चर करणार महाविकास आघाडीची गाडी!!
- पती-पत्नीच्या नात्यावर आधारित नवीन नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
- Axis Bank वर RBI ची मोठी कारवाई; 90 लाखांपेक्षा अधिक दंड ठोठावला!