• Download App
    चलनवाढ कमी झाल्याने दिलासा, ऑगस्टमध्ये अन्न धान्य, भाज्यांच्या किमतीत घट|CFPI inflation rate decreses

    चलनवाढ कमी झाल्याने दिलासा, ऑगस्टमध्ये अन्न धान्य, भाज्यांच्या किमतीत घट

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – ऑगस्ट महिन्यातील चलनवाढीचा दर जुलैच्या तुलनेत कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया सामान्यांमधून व्यक्त होत आहे. बऱ्याच जीवनावश्यक गोष्टींचे भाव कमी झाल्याने सीपीआय इन्फ्लेशन ५.३० टक्क्यांवर तर सीएफपीआय इन्फ्लेशन ३.११ टक्क्यांवर आले.CFPI inflation rate decreses

    ग्राहक किंमत निर्देशांक जुलै महिन्यात ५.५९ होते. त्यानंतर प्रमुख वस्तूंचे भाव कमी झाल्याने हा चलनवाढ निर्देशांक कमी झाला. तर ग्राहक अन्न किंमत चलनवाढ निर्देशांक जुलै महिन्यात ३.९६ होता, तोही आता कमी झाला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.



    अन्न तसेच भाज्यांच्या किमती कमी झाल्याने सीपीआय इन्फ्लेशन कमी झाले. मात्र खाद्यतेलाचे दर गेल्यावर्षीपेक्षा यंदा ३३ टक्क्यांहूनही जास्त वाढल्याने तो एक चिंतेचा विषय असल्याचे बोलले जात आहे.चलनवाढ आटोक्यात आली तर व्याजदर कमी होण्याची आणि त्याकारणाने कर्जेही स्वस्त होण्याची आशा सर्वांना आहे.

    मे महिन्यात स्थानिक निर्बंध व लॉकडाऊनमुळे अन्नधान्याच्या किमती वाढल्या तसेच इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचे दरही वाढले होते. त्यामुळे चलनवाढीचा दर वरच्या दिशेने झेपावला होता. आता तेथून तो हळुहळू कमी होत चालला आहे. चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेनुसार आटोक्यात येत असल्याने ते दिलासादायी असल्याचे मानले जात आहे.

    CFPI inflation rate decreses

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!