प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारकडून राज्यांना विविध योजनांलाठी ५०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये भांडवली खर्चासाठी ऊर्जा विभागाला ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात महानिर्मिती व महापारेषणला २५० कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत ५० वर्षे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार राज्याला ५०० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. Centre’s gift to Maharashtra; 500 crore sanctioned for various schemes; This is the beginning of 2023
असे होणार २५० कोटींचे वितरण
- साखरी सौर प्रकल्पाला ३० कोटी
- दोंडाएचा सौर प्रकल्पाला ७० कोटी
- ईरइ डॅम सौर प्रकल्पाला ३० कोटी
- उलवे नोड जीआयएस सब स्टेशन २७ कोटी ३९ लाख
- पावणे जीआयएस सब स्टेशन २१ कोटी
- मानकोली जीआयएस सब स्टेशन १६ कोटी चार लाख
- तीर्थपुरी जीआयएस सब स्टेशन ८ कोटी ९३ लाख
- पनवेल जीआयएस २५ कोटी
- शहा सब स्टेशन १२ कोटी २९ लाख
- धानोरा सब स्टेशन ८ कोटी ७८ लाख
Centre’s gift to Maharashtra; 500 crore sanctioned for various schemes; This is the beginning of 2023
महत्वाच्या बातम्या