Covishield Vaccine : देशातील कोरोना लसीची वाढती मागणी आणि उपलब्धता लक्षात घेता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिटनला पाठवण्यात येणारे कोव्हिशील्डचे 50 लाख डोस आता भारतातच वापरण्यात येणार आहेत. केंद्र सरकार हे डोस देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देणार आहे. Centers big decision, 50 lakh doses of covishield vaccine to be sent to UK Now will be used in India alone
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीची वाढती मागणी आणि उपलब्धता लक्षात घेता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिटनला पाठवण्यात येणारे कोव्हिशील्डचे 50 लाख डोस आता भारतातच वापरण्यात येणार आहेत. केंद्र सरकार हे डोस देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देणार आहे.
तथापि, यापूर्वी ही लस सीरम संस्थेद्वारे ब्रिटनला पाठवण्यात येत होती. लसीच्या या डोसद्वारे 18 ते 44 वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. 23 मार्च रोजी सीरम संस्थेने आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून कोव्हिशील्डचे 50 दशलक्ष डोस ब्रिटनला पुरविण्यास मान्यता मागितली होती.
सीरम संस्थेने या संदर्भात अॅस्ट्राझेनेकाबरोबर झालेल्या कराराचा हवाला दिला आणि भारताला आश्वासन दिले की, या पुरवठ्यामुळे त्यांच्या लसीकरण कार्यक्रमावर परिणाम होणार नाही. त्यानंतर मंत्रालयाने राज्यांना कंपनीशी संपर्क साधून लस खरेदी त्वरित करण्यास सांगितले.
काही राज्यांमध्ये साडेतीन लाख डोसचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर काही राज्यांना प्रत्येकी एक लाख, तर काही राज्यांना 50 हजार डोस मिळाले आहेत. या लसींवर कोविशील्डऐवजी कोविड-19 अॅस्ट्राझेनेकाचे लेबल लावण्यात आलेले आहे. काही दिवसांपासून भारतात दररोज चार लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत, मृतांच्या संख्येनेही उच्चांक गाठला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाला वेग आल्यास महामारी रोखण्यास मोठी मदत होणार आहे.
Centers big decision, 50 lakh doses of covishield vaccine to be sent to UK Now will be used in India alone
महत्त्वाच्या बातम्या
- ऑक्सिजन आणि औषधांच्या वितरणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून टास्क फोर्सची स्थापना, 10 प्रसिद्ध डॉक्टरांचा समावेश
- Maratha Reservation : राज्य सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची तयारी, निकालाच्या विश्लेषणासाठी समितीही केली स्थापन
- काँग्रेसच्या संदीप दीक्षितांनी काढले केजरीवाल सरकारचे वाभाडे, म्हणाले- त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल व्हावा! वाचा सविस्तर…
- पंजाब सरकारचा भोंगळ कारभार उघड, सरकारी साठ्यातील हजारो रेमडेसिव्हिर इंजेक्शन सापडले भाक्रा कालव्यात
- Palanivel Thiagrajan : नास्तिकांच्या पक्षातला उत्कट देवीभक्त, जाणून घ्या तामिळनाडूच्या उच्चविद्याविभूषित नव्या अर्थमंत्र्यांबद्दल…