• Download App
    समुद्रात उभारणार ५० हजार कोटींचा पूल, नितीन गडकरी यांची घोषणा; वरळी-वांद्रे सी लिंक दिल्ली-मुंबई हायवेला जोडणार। Central Minister Nitin Gadkari Bandra Worli Sea Link Delhi Mumbai Highway; For that 50,000 crore Rupees bridge to be built in the sea

    समुद्रात उभारणार ५० हजार कोटींचा पूल, नितीन गडकरी यांची घोषणा; वरळी-वांद्रे सी लिंक दिल्ली-मुंबई हायवेला जोडणार

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबई-दिल्ली हायवे हा वरळी सी-लिंकला जोडणार असून त्यासाठी ५० हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. Central Minister Nitin Gadkari Bandra Worli Sea Link Delhi Mumbai Highway; For that 50,000 crore Rupees bridge to be built in the sea

    “मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, वरळी-वांद्रे सी लिंक, ५५ उड्डाणपूल अशी अनेक काम केल्याचे सांगताना ते म्हणाले, ”मला वरळी-वांद्रे सी लिंक वसई विरारच्या पलीकडे नेऊन दिल्ली-मुंबई हायवेला जोडायचा होता. आता मी दिल्ली-मुंबई हायवे एक लाख कोटींचा बांधत असून तो जेएनपीटीपर्यंत आहे. त्याचं ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्या हायवेला वरळी सी लिंकपर्यंत पोचवण्याचं माझं स्वप्न आहे. त्यासाठी ५० हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना आहे.”



    “महाराष्ट्र सरकारची संमती मिळाल्यास हा पूल बांधायला घेणार आहोत. त्यावर अभ्यास सुरु झाला आहे. हा पूल असता तर वेस्टर्न एक्स्प्रेस-वेवर गर्दी झाली नसती त्यामुळे हा पूल बांधायचं डोक्यात आहे. “मुंबईत मेट्रोच्या वरही पूल झाले असते तर वाहतुकीची कोंडी सुटली असती. पण वरळी वांद्रे सी-लिंक प्रोजेक्ट करुन रस्ता वाढवू. कारण ही मुंबईची लाइफलाइन आहे,” असे त्यांनी सांगितलं. याच बरोबर मुंबई आणि पुण्यातलं ट्रॅफिक ५० टक्के कमी करणार असल्याचे ते म्हणाले.

    Central Minister Nitin Gadkari Bandra Worli Sea Link Delhi Mumbai Highway; For that 50,000 crore Rupees bridge to be built in the sea

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची सडकून टीका- पवार ईस्ट इंडिया कंपनीने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवले!

    Asim Sarode : असीम सरोदेंचा ​​​​​​​सरकारला सवाल- मराठा आरक्षणाचा GR क्लिष्ट, अंमलबजावणीवर शंका!

    Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांचा सवाल- गुलाल उधळला होता, तर जरांगे पुन्हा मुंबईत का आले? ओबीसींचे आरक्षण वाढवा!