Jumbo Covid Center at BPCL : राज्यात कारोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त रुग्णसंख्या आढळत आहे. यादरम्यान राज्यात ठिकाणी हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. आता केंद्र सरकारने राज्याला 1785 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला असून इतर राज्यांच्या तुलनेत हा आकडा जवळजवळ दुप्पट आहे. याहीपुढे जाऊन बेडच्या कमतरतेवर तोडगा काढण्यासाठी केंद्राने आता बीपीसीएलच्या मुंबईतील रिफायनरीत जम्बो कोविड सेंटर उभारण्यास तातडीने मान्यता दिली आहे. Central Govt Gives Quick approval for Jumbo Covid Center at BPCL refinery in Mumbai
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कारोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त रुग्णसंख्या आढळत आहे. यादरम्यान राज्यात ठिकाणी हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. आता केंद्र सरकारने राज्याला 1785 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला असून इतर राज्यांच्या तुलनेत हा आकडा जवळजवळ दुप्पट आहे. याहीपुढे जाऊन बेडच्या कमतरतेवर तोडगा काढण्यासाठी केंद्राने आता बीपीसीएलच्या मुंबईतील रिफायनरीत जम्बो कोविड सेंटर उभारण्यास तातडीने मान्यता दिली आहे.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत करून आभार मानले आहेत. मुंबईतील बीपीसीएलच्या रिफायनरीजवळ जंबो कोविड सेंटर उभारण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे मागितली होती. यावर केंद्राने तातडीने सहमती दर्शवली आहे. याहीपुढे जाऊन येथील रुग्णांना विनाअडथळा ऑक्सिजन पुरवठा करण्यास बीपीसीएलने सहमती दर्शवली आहे.
केंद्राच्या या निर्णयामुळे हजारो बेड्स उपलब्ध होणार आहेत. बीपीसीएलचे मार्केटिंग डायरेक्टर अरुण सिंग यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून याबाबत माहिती दिली. ते असेही म्हणाले की, राज्य सरकारने जर कम्प्रेसरची सुविधा दिली तर ते ऑक्सिजन सिलिंडर्सही भरण्यास तयार आहेत.
Central Govt Gives Quick approval for Jumbo Covid Center at BPCL refinery in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- Vaccination : कॉंग्रेसशासित 3 राज्यांचा 1 मेपासून लसीकरणास नकार, लसीच्या तुटवड्याचे दिले कारण
- महाराष्ट्र शासनाची मोठी घोषणा, प्रत्येक नागरिकाला मोफत मिळणार कोरोनाची लस
- केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक 1784 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा, इतर राज्यांपेक्षा दुप्पट
- आता दूर होईल ऑक्सिजनचा तुटवडा, देशभरात ५५१ PSA Oxygen Plants ची पंतप्रधान मोदींची घोषणा
- जगात पहिल्यांदा येणार भारताची Nasal Vaccine, कोरोनाला हरवण्यासाठी सर्वात प्रभावी