या योजनेला महिला वर्गाची चांगलीच पसंती
विशेष प्रतिनिधी.
पुणे : केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने दोन वर्ष अल्पमुदतीसाठी महिला सन्मान बचत पत्र ही योजना जाहीर केली आहे.
या योजनेअंतर्गत भारतीय डाक विभागाच्या पुणे शहर पूर्व विभागाने 23 ते 26 जून या दरम्यान महिलांसाठी विशेष अभियान राबवलं होतं. Central Government women’s Saving Scheme.
या अभियानांतर्गत अवघ्या तीन दिवसात दहा हजारापेक्षा अधिक महिलांनी महिला सन्मान बचत पत्र या योजनेअंतर्गत 39 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.या अभियानामध्ये पुणे शहर पूर्व विभागातील 65 पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
ही योजना सर्वयोगटातील महिलांसाठी असून, एका खात्यात कमीत कमी एक लाख,तर जास्तीत जास्त दोन लाख रुपये एवढं भांडवल गुंतवता येणार आहे. ही योजना दोन वर्षासाठी असून,यावर 7. 5% व्याजदर असणार आहे . एक वर्ष झाल्यानंतर महिलांना खात्यातली 40% रक्कम काढता येणार आहे.
महिला सन्मान बचत पत्र ही योजना सुरक्षित असून,
ही योजना केंद्र सरकारनं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केली आहे.जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन भारतीय डाक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे .या योजनेला महिला वर्गाची चांगलीच पसंती आहे
Central Government women’s Saving Scheme.
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल यांच्या सरकारी बंगल्याचे कॅग ऑडिट करणार; नूतनीकरणासाठी 53 कोटी रुपये खर्च, एलजींनी गृह मंत्रालयाला केली होती शिफारस
- आदिपुरुषवर अलाहाबाद हायकोर्ट म्हणाले- दरवेळी हिंदूंच्या सहिष्णुतेची परीक्षा कशाला? नशीब, त्यांनी कायदा मोडला नाही!
- पुतीनविरोधात बंड होणार हे अमेरिकेला माहिती होते, रिपोर्टमध्ये दावा- त्यांनी हे नाटोपासूनही लपवले
- काश्मीरमध्ये १५ दिवसांत ११ पाकिस्तानी दहशतवादी ठार; ५५ किलो ड्रग्ज अन् मोठ्याप्रमाणात शस्त्रंही जप्त!