• Download App
    Central Government Approves ₹1,566.40 Crore SDRF Funds for Flood-Affected Maharashtra; ₹384.40 Crore Sanctioned for Karnataka महाराष्ट्रातील अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून 1,566 कोटींचा निधी मंजूर

    maharashtra: महाराष्ट्रातील अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून 1,566 कोटींचा निधी मंजूर; गृहमंत्रालयाकडून कर्नाटक राज्यालाही 384 कोटींची मदत जाहीर

    Maharashtra

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : maharashtra  मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरसंकटाचा मोठा फटका बसलेल्या महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र सरकारने १५६६.४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) अंतर्गत केंद्राची ही दुसऱ्या टप्प्यातील मदत आहे. अतिवृष्टी तसेच पूरग्रस्तांची तत्काळ मदत आणि पुनर्वसनाच्या कार्यात हा निधी दिलासा देणारा ठरणार आहे.maharashtra

    केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी चालू आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यासाठी एसडीआरएफच्या केंद्रीय वाट्यातील दुसरा हप्ता म्हणून एकूण १,९५०.८० कोटी रुपये आगाऊ मंजूर करण्यास मान्यता दिली. यात महाराष्ट्रासाठी १,५६६.४० कोटी रुपये आणि कर्नाटकसाठी ३८४.४० कोटी रुपयांचा समावेश आहे, असे गृहमंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित राज्यांना सर्वतोपरी मदतीस कटिबद्ध आहे, असेही यात नमूद केलेले आहे.Central Government



    चालू वर्षी राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीएमएफ) मधून २१ राज्यांना ४,५७१.३० कोटी, राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीएमएफ) मधून ९ राज्यांना ३७२.०९ कोटी रुपये देण्यात आले. मदतीसाठी महाराष्ट्रासह ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत एनडीआरएफची सर्वाधिक १९९ पथके तैनात करण्यात आली होती.

    सरकार आपत्तीकाळात लोकांसोबत उभे : अमित शाह

    गृहमंत्री शाह यांनी आपल्या एक्स खात्यावरूनही मदतनिधीविषयीची माहिती दिली. “मोदी सरकार आपत्ती आणि त्यानंतरच्या काळात लोकांसोबत उभे आहे. १९५०.८० कोटी रुपयांचा आगाऊ निधी अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना तात्काळ मदत देण्यासाठी केला जाईल. या वर्षी केंद्राने एसडीआरएफ अंतर्गत २७ राज्यांना १३,६०३.२० कोटी रुपये आणि एनडीआरएफ अंतर्गत १५ राज्यांना २१८९.२८ कोटी रुपये जारी केले,’ असे शाह म्हणाले.

    Central Government Approves ₹1,566.40 Crore SDRF Funds for Flood-Affected Maharashtra; ₹384.40 Crore Sanctioned for Karnataka

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Sudhir Mungantiwar : राज ठाकरे हे कुशल संघटक, मात्र भूमिकेत सातत्य नाही, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

    Jayant Patil : ज्यांना बोगस मतदानाचा फायदा झाला ते मोर्चात सहभागी होणार नाहीत; जयंत पाटलांची प्रतिक्रिया, आयोगाने अनेक गोष्टी दडवल्याचा आरोप

    Devendra Fadnavis : महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे पंख; नागपुरात प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन!!