• Download App
    सी-डॅक तीन नावीन्यपूर्ण उत्पादन लाँच करणारCDAC launching three new equipments Trineti, Tetra and M-Kavach 

    सी-डॅक तीन नावीन्यपूर्ण उत्पादन लाँच करणार

    सी-डॅक स्थापना दिनानिमित्त सामाजिक उपयोगासाठी गरजेचे असलेले तीन नावीन्यपूर्ण उत्पादन लाँच करणार आहे. २ एप्रिल २०२२ रोजी सी-डॅक आपला ३५ वा स्थापना दिवस साजरा करत आहे.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे – देशातील संगणन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असलेल्या प्रगत संगणन विकास केंद्राच्या (सी-डॅक) स्थापना दिनानिमित्त सामाजिक उपयोगासाठी गरजेचे असलेले तीन नावीन्यपूर्ण उत्पादन लाँच करणार आहे. २ एप्रिल २०२२ रोजी सी-डॅक आपला ३५ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्रिनेत्र, टेट्रा आणि एम-कवच २ ही तीन उत्पादने नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. CDAC launching three new equipments Trineti, Tetra and M-Kavach

    वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास अनेक प्रख्यात मान्यवर संबोधित करणार आहेत, अशी माहिती ‘सी-डॅक’चे महासंचालक कर्नल. आशीत कुमार नाथ (निवृत्त) यांनी पत्रकार परिषदेत दिली. कॉर्पोरेट विभागाचे वरिष्ठ संचालक (आर अँड डी) डॉ. एन. सुब्रमण्यम, एनएसएमचे मिशन डायरेक्टर डॉ. हेमंत दरबारी, एचपीसी टेकचे संचालक आणि एचओडी संजय वांढेकर यावेळी उपस्थित होते. सायबर विश्वातील संभाव्य सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ‘सायबरमार्गदर्शक’ या हॅण्डबूकचे अनावरण यावेळी सी-डॅकच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

    www.infosecawareness.in या संकेतस्थळावरून हे पुस्तक मोफत डाऊनलोड करता येवू शकते. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माहिती सुरक्षा शिक्षण आणि जागरूकता कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हे बुक तयार करण्यात आले आहे. त्रिनेत्र हे सुपर कंप्युटरसाठी ६०० जीबीपीएस थ्रुपुटचे इंटरकनेक्ट आहे. हे त्रिनेत्र-ए या या श्रृंखलेतील चौथ्या जनरेशनचे नेटवर्क आहे. तर टेट्रा हे अति महत्त्वपूर्ण संचारासाठी टेट्रा (टेरेस्ट्रीअल ट्रॅक्ड रेडिओ) तंत्रज्ञानावर आधारित असलेले एक बिनतारी संचार नेटवर्क आहे. एम-कवच २ हे नव्याने समोर येत असलेल्या सायबर धोक्यांना सक्षमरित्या हाताळण्यासाठी अँड्रॉइड आधारित मोबाईल सुरक्षा अॅप आहे.

    CDAC launching three new equipments Trineti, Tetra and M-Kavach

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा