विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. देशमुख यांच्या विरुद्धचा सीबीआयचा कथित प्राथमिक चौकशी अहवाल फोडल्याप्रकरणी सीबीआयने बुधवारी रात्री उशिरा उपनिरीक्षक अभिषेक तिवारी याला अटक केली. देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशी करून अवघ्या २० मिनिटांत त्यांची सुटका करण्यात आली. Cbi Psi arrested for leaking report in Anil Deshmukh’s case
नागपूरचे वकील ॲड. आनंद डागा आणि इतर काही अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी करून २० मिनिटांतच त्यांची सुटका करण्यात आली.
याप्रकरणी अलाहाबाद व दिल्लीत काहींचा शोध घेण्यात येत आहे. शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या या प्रकरणात बेकायदेशीर अहवाल फोडणे व त्यामध्ये फेरफार करण्यात सीबीआयमध्ये कार्यरत असलेला पीएसआय तिवारी मुख्य सूत्रधार होता. वकील व काही जणांचा यात सहभाग असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.
वरळी येथील सुखदा इमारतीतील फ्लॅटमधून बाहेर पडत असताना दहा जणांच्या एका पथकाने चतुर्वेदी यांना ताब्यात घेतले. कोणतीही नोटीस अथवा पूर्वसूचना न देता सीबीआयकडून ही कारवाई झाल्याने देशमुख कुटुंबीयांकडून चतुर्वेदी यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार वरळी पोलीस ठाण्यात देण्यात आली.
मात्र वरळी पोलिसांनी अशा प्रकरणात गुन्हा दाखल करता येत नसल्याचे त्यांना समजावले. चतुर्वेदी हे पेशाने डॉक्टर असून, ते जसलोक हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतात. साई शिक्षण संस्था हवाला पैसे ट्रान्सफर व प्राथमिक चौकशी अहवाल फोडल्याप्रकरणी चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
दुपारी वरळीतील सुखदा इमारतीतून गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा आपल्या गाडीने जात असता सीबीआयने गाडी रोखून त्यांना ताब्यात घेतले. अनिल देशमुख क्लीन चिट कागदपत्रांबाबत चतुर्वेदी यांचा जबाब नोंदवून वीस मिनिटांत त्यांना सोडण्यात आले. आवश्यकतेनुसार त्यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
Cbi Psi arrested for leaking report in Anil Deshmukh’s case
महत्त्वाच्या बातम्या
- GST Collection In August : जीएसटी संकलनात ३०% ची मोठी वाढ, २ दिवसांत अर्थव्यवस्थेसाठी ४ आनंदाच्या बातम्या
- तालिबानकडून सुशिक्षित मुलींचा घरोघरी शोध; अमेरिकेचे एजंट असल्याचा आरोप, बलात्कार आणि हत्येची धमकी
- मोदींच्या GDP तील वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol ची दरवाढ; २३ लाख कोटी रूपये गेले कुठे? राहुल गांधींची सरकारवर टीका