• Download App
    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुध्द सीबीआय चौकशी सुरू|CBI probe against former Home Minister Anil Deshmukh

    सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू होण्यापूर्वीच सीबीआयने अनिल देशमुखांविरुद्ध नोंदविली प्राथमिक चौकशी!

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयने चौकशी सुरु केली आहे. सीबीआयची टीम बुधवारपासून तपासाला सुरूवात करणार आहे. सर्वात प्रथम सीबीआय परमबीर सिंह यांचा जबाब घेणार आहे. मुंबइचे पोलीसउपायुक्त राजू भुजबळ आणि त्यांच्या सोबतच एसीपी पाटील यांनाही चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे. यांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहेCBI probe against former Home Minister Anil Deshmukh


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयने चौकशी सुरु केली आहे. सीबीआयची टीम बुधवारपासून तपासाला सुरूवात करणार आहे. सर्वात प्रथम सीबीआय परमबीर सिंह यांचा जबाब घेणार आहे.

    मुंबइचेर् पोलीसउपायुक्त राजू भुजबळ आणि त्यांच्या सोबतच एसीपी पाटील यांनाही चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे. यांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. यासोबत सीबीआयची टीम याप्रकरणी पुरावे गोळा करण्याचे काम करेल आणि जर प्रथमदर्शनी तपासामध्ये पुरावे समोर आले तर या प्रकरणात गुन्हा दाखल केला जाणार आहे.



    सीबीआयकडून अनिल देशमुख यांची चौकशी होणार आहे. ही चौकशी गुन्हा दाखल झाल्यानंतर होईल का आधी हे तपासाची दिशा पाहता निर्णय घेतला जाईल. मंगळवारी सीबीआयच्या इन्सपेक्टर रँकचे चारअधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत.

    पुढच्या एक ते दोन दिवसांमध्ये एसपी रँकचे अधिकारी देखील मुंबईत दाखल होतील. पुढच्या 15 दिवसांत तपासाचा अहवाल उच्च न्यायालयात साजर केला जाईल आणि त्यानंतर सीबीआय तपासासाठी आणखी वेळ मागण्याचा प्रयत्न करणार आहे.

    अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर तात्काळ अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, एका बाजुला नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा दिला असे म्हणणारे देशमुख आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.

    गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी तातडीने दिल्ली गाठली. दिल्लीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत रात्री नऊ ते दहा अशी जवळपास तासभर खलबतं केली. यावेळी राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील राहुल चिटणीस आणि इतर

    जवळपास पाच ते सहा वकिलांची फौजही सिंघवी यांच्या ‘अनीतायन’ या निवासस्थानी हजर होती. उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालय याबाबत काय पाऊल उचलता येईल यावर या बैठकीत मंथन झालं आहे.

    CBI probe against former Home Minister Anil Deshmukh

    इतर बातम्या वाचा…

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!