• Download App
    वसुली प्रकरण : CBIने अनिल देशमुखांविरूद्ध दाखल केली FIR, अनेक ठिकाणी छापेमारी । CBI files FIR against Anil Deshmukh former Maharashtra home minister in Corruption Case

    वसुली प्रकरण : CBIने अनिल देशमुखांविरूद्ध दाखल केली FIR, अनेक ठिकाणी छापेमारी

    CBI files FIR against Anil Deshmukh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिपद गमावणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरुद्ध सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुखांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. याचबरोबर त्यांच्या अनेक जागांवर छापेमारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीआयने अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुखांचे मंत्रिपद गेले, यानंतर हायकोर्टाने त्यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीला मंजुरी देत तसे आदेश दिले होते. CBI files FIR against Anil Deshmukh former Maharashtra home minister in Corruption Case


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिपद गमावणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरुद्ध सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुखांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. याचबरोबर त्यांच्या अनेक जागांवर छापेमारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीआयने अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुखांचे मंत्रिपद गेले, यानंतर हायकोर्टाने त्यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीला मंजुरी देत तसे आदेश दिले होते.

    दरम्यान, अनिल देशमुख यांची चौकशी करण्यापूर्वी सीबीआयने देशमुख यांच्या दोन स्वीयस सहाय्यकांची चौकशी केली होती. याशिवाय एनआयएच्या ताब्यात असलेले मुंबई पोलिसांतून निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्या दोन ड्रायव्हरचीही चौकशी केली होती.

    उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर परमबीरसिंग यांची आयुक्त पदावर उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आरोप केला होता की, अनिल देशमुख आपल्या पदाचा गैरवापर करत असून त्यांनी वाझेंना मुंबईतल्या 1700 बार आणि रेस्तराँमधून दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टारगेट दिले होते. नुकतेच वाझे यांनी एनआयए कोर्टाला दिलेल्या पत्रातही हे आरोप केले आहेत.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या या आरोपांबाबत उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एका परिषद परिषदेत माहिती दिली की, देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा सादर केला आहे. देशमुख यांनी राजीनाम्याची एक प्रतदेखील ट्विट केली होती. ज्यात वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आरोपांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी पत्रात लिहिले की, “कोर्टाच्या आदेशानंतर मला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया मला माझ्या पदापासून मुक्त करा.”

    CBI files FIR against Anil Deshmukh former Maharashtra home minister in Corruption Case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू