• Download App
    सत्तांतर झाले : फाईल क्लोज; उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मनी लॉड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा!!|CBI Files closure report in shridhar patankar money laundering case

    सत्तांतर झाले : फाईल क्लोज; उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मनी लॉड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर झाले. ठाकरे सरकार कोसळल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. मात्र दुसरीकडे त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मोठ दिलासा मिळाला आहे. पाटणकर यांच्यावर झालेल्या मनी लाॅंड्रिंग प्रकरणी कारवाईसाठी सबळ पुरावे उपलब्ध नसल्याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने न्यायालयात सादर केला आहे आणि न्यायालयाने तो स्वीकारला आहे.CBI Files closure report in shridhar patankar money laundering case

    84.6 कोटीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने युनियन बॅंकेचे अधिकारी, काही ज्वेलर्स आणि पु्ष्पक बुलियन कंपनीचे संचालक यांच्याविरोधात मनी लाॅंड्रिंगचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. या प्रकरणात ईडीने केलेल्या कारवाईत श्रीधर पाटकर यांची 6.5 कोटींची मालमत्ता जप्तही करण्यात आली होती. मात्र ईडीचा विरोध असूनही शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयाने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे.



    काय आहेत आरोप? 

    चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांनी संगनमताने पुष्पक रिएलिटी या पुष्पक ग्रुप कंपनीमधील तब्बल 20 कोटी रुपयांची रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत हमसफर डीलर प्रा.लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीमार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मीती या कंपनीला 30 कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचे दाखवले, असल्याचा आरोप करण्यात आला होता.

    CBI Files closure report in shridhar patankar money laundering case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा