विशेष प्रतिनिधी
मुंबई : Bhagyashree Navtak जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील तब्बल 1200 कोटींच्या घोटाळ्यातले संशयित आरोपी सुनील झंवर आणि कुणाल शाह यांनी पोलीस महासंचालकांकडे दिलेल्या तक्रार अर्जावरून पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला आहे. त्यानंतर सीबीआयने याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे.Bhagyashree Navtak
फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी सीबीआयने नवटाकेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नवटाके यांनी 1200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाचं नेतृत्त्व केलं होतं. यामध्ये त्यांनी उचित कायदेशीर कारवाई केली नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनी यामध्ये आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप होत आहे.
नवटाके यांनी प्रचलित कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष करून घाईगडबडीने, तसेच कोणता तरी हेतू मनात ठेवून गुन्हे दाखल केले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस उपायुक्त नवटाके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा सीबीआयकडे तपासासाठी सोपवण्यात आला असून आता सीबीआयने नवटाके यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
याप्रकरणी, पुणे जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यांत नोव्हेंबर 2020 मध्ये गुन्हे दाखल झाले होते. त्या अनुषंगाने सुनील झंवर आणि कुणाल शाह यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाची पोलीस महासंचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यानंतर १९ फेब्रुवारी २०२४ रोजी पोलीस महासंचालकांकडून याबाबतचा चौकशी अहवाल गृह विभागाकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशांनंतर आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं आहे.
दलितविरोधी वक्तव्य भोवले होते
बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी कार्यरत असताना महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांना दलित बांधवांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे भोवलं होतं. त्यानंतर त्यांची औरंगाबादला बदली करण्यात आली होती.
CBI files case against IPS officer Bhagyashree Navtak in BHR 1200 crore scam; Attention to complaints of suspects!!
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi : मोदी बनले भाजपचे पहिले सक्रिय सदस्य; पंतप्रधानांनी सदस्यत्व मोहिमेला केली सुरुवात
- NCP SP : पवारांच्या राष्ट्रवादीत आलेत नेते 10, 7 वाटेवर; पण “चाणक्य खेळी”च्या बातम्या शेकड्यांवर!!
- CJI Chandrachud : संविधान बदलाच्या नॅरेटिव्हला सरन्यायाधीशांची थप्पड; ब्रिटिशकालीन न्याय देवतेचे भारतीयीकरण!!
- Supreme Court : फ्रीबीजवरून सुप्रीम कोर्टाची केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस; याचिकाकर्त्यांची बंदीची मागणी