वृत्तसंस्था
पुणे : पुण्यातील व्यवसायिक आणि शरद पवारांस अनेक बड्या नेत्यांचे निकटवर्ती अविनाश भोसले यांना सीबीआयने डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्यात अटक केली आहे. त्यांची सीबीआय कोठडी 8 जूनपर्यंत वाढविण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. त्याच बरोबर घोटाळ्याच्या तपासाच्या दृष्टीने आवश्यक असल्यास अविनाश भोसले यांना महाराष्ट्राबाहेर नेऊन तपास करण्याची परवानगी कोर्टाने सीबीआयला दिली आहे. अविनाश भोसले यांची 40 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आधीच जप्त केली आहे. CBI extends Avinash Bhosale’s custody
शिवसेनेचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती अनिल परब यांच्या घरांवर सक्तवसुली संचनालय अर्थात ईडीने ज्या दिवशी छापे घातले त्याच दिवशी सायंकाळी शरद पवारांसह अनेक बड्या नेत्यांचे निकटवर्ती व्यावसायिक अविनाश भोसले यांना केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने अटक केली.
येस बँक आणि डीएचएफएल घोटाळा प्रकरणात अविनाश भोसले यांचा हात असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सीबीआयने या प्रकरणाचा पूर्ण तपास करून अविनाश भोसले यांना आज सायंकाळी बेड्या घातल्या आहेत. अविनाश भोसले यांच्या घरांवर आणि विविध व्यावसायिक ठिकाणांवर ३० एप्रिल रोजी सीबीआयने काही ठिकाणी छापे घातले होते.
अविनाश भोसले यांची यापूर्वी ईडी आणि सीबीआयने चौकशीही केली होती. ईडीने त्यांची 40 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीएचएफल प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय अविनाश भोसले यांचा शोध सुरु होता. ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांअंतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. अविनाश भोसले यांना अटक केल्यानंतर सीबीआय पुढील कारवाई नेमकी कोणावर करणार हे लवकरच समोर येणे अपेक्षित आहे समोर येईल. डीएचएफएल येस बँक वाधवान प्रकरणात सीबीआय अविनाश भोसले यांच्या शोधात होती.
– विश्वजीत कदम यांचे सासरे
सर्वसामान्य रिक्षाचालक म्हणून व्यवसाय सुरुवात करणारे अविनाश भोसले यांची बांधकाम व्यावसायिक म्हणून पुण्यासह राज्यातील विविध भागांत ओळख आहे. तसेच व्यवसायासोबतच शरद पवार यांच्यासह अनेक पक्षांच्या राजकीय नेत्यांसोबतच्या संबंधांमुळेही अविनाश भोसले चर्चेत असतात. अनेक बडे राजकीय नेते त्यांचे हेलिकॉप्टर वापरून राजकीय दौरे करत असतात. काँग्रेस नेते राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे ते सासरे आहेत. गेल्या काही काळापासून ईडीने त्यांच्याविरोधात कारवाईचा धडाका सुरू केल्याने ते अडचणीत सापडले आहेत.
आता कोर्टाने त्यांच्या सीबीआय कोठडीत 8 जून पर्यंत वाढ केली आहे. त्यांना राज्याबाहेर नेऊन तपास करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे येस बँक घोटाळा प्रकरणात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
CBI extends Avinash Bhosale’s custody
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारची 8 वर्षे : सरकारची भलामण; विरोधकांचे शरसंधान… पण जनतेच्या मनात नेमके काय??
- UPSC : महाराष्ट्रातील 60 हून अधिक विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश!!; महाराष्ट्र कन्यांची बाजी!!
- राज्यसभा निवडणूक : कोल्हापूरचा कोणता पैलवान जास्तीत जास्त अपक्षांना खेचणार??
- भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान घायकुतीला; ट्रॅक 2 डिप्लोमसीचा करावा लागतोय वापर!!