वृत्तसंस्था
मुंबई – १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुखांचे आणखी चाळे उघडकीस आले आहेत. आपल्याला क्लीन चिट मिळावी तसेच ती बातमी बाहेर फुटावी यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या माणसाकरवी सीबीआयच्या अधिकाऱ्याला लाच देऊन फितविले. आता त्या लाचखोर अधिकाऱ्यालाच अटक करण्यात आली आहे. CBI detains man for ‘manipulating’ preliminary enquiry in Anil Deshmukh case
सीबीआयचे उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी अभिषेक तिवारी यांना अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांकडून लाच घेतल्यानंतर अटक करण्यात आली. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार अभिषेक तिवारी हा अनिल देशमुखांच्या वकिलाच्या संपर्कात होता. अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानावरून बुधवारी वकिलांनाही ताब्यात घेण्यात आले. सध्या त्याची चौकशी सीबीआयकडून चौकशी केली जात आहे.
सीबीआयने आपले उपनिरीक्षक, नागपूरस्थित वकील आणि अज्ञात इतरांच्या विरोधात लाचप्रकरणी काही आरोपांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यानच सीबीआयने बुधवारी आपल्याच खात्यातील उपनिरीक्षकाला अटक केली आहे. तसेच वकिलाची चौकशी केली जात आहे, असे सीबीआयचे प्रवक्ते आर. सी. जोशी यांनी इंडिया टुडेला सांगितले. प्रयागराज आणि दिल्ली येथील अभिषेक तिवारी यांच्याशी संबधित असलेल्या ठिकाणीही सीबीआयचे अन्य अधिकारी शोध घेत आहेत.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांचीही चौकशी केली. नंतर सीबीआयने त्यांना जाण्यास परवानगी दिली. यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता केंद्रीय तपास यंत्रणांनी आज अनिल देशमुख यांचे जावई आणि त्यांच्या वकिलांना कुठल्याही नोटीसीशिवाय उचलून नेले असे कळते. हे अत्यंत गंभीर आहे. देशात मोदीशाही चालू आहे. नियम कायदे गुंडाळले गेले आहेत. हम कहे सो कायदा आहे” असे मोदी सरकारने अधिकृतपणे जाहीर करून टाकावे. जाहीर निषेध!, असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
CBI detains man for ‘manipulating’ preliminary enquiry in Anil Deshmukh case
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकील सीबीआयच्या ताब्यात!!
- राज्यात एमबीबीएस, एमडीच्या जागा वाढणार, सार्वजनिक खासगी गुंतवणुकीद्धारे नवीन वैद्यकीय महाविद्यालये, अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करणार
- मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंसह सर्वपक्षीय शिष्टमंडळ गुरूवारी घेणार राष्ट्रपतींची भेट
- ग्लोबल जिहाद – इस्लामच्या शत्रुंपासून काश्मीर सोडवा