प्रतिनिधी
पुणे : काँग्रेसचे आक्रमक प्रदेशाध्यक्ष सध्या काँग्रेस मधून आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून विविध प्रकारे अडचणीत आले असताना नानांना पुण्याच्या काँग्रेस हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ एक मांजर आडवी जातच होती, पण काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मात्र नानांना आडवी जाऊ पाहणाऱ्या मांजरीला मध्ये उभे राहून हुसकावून लागल्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे. Cat crossing may be superstitious, but how will Congress overcome its factionalism??
या व्हिडिओवरून मराठी माध्यमांनी अंधश्रद्धेच्या बातम्या केल्या आहेत. त्याचा संबंध काँग्रेसच्या सध्याच्या राजकीय अवस्थेशी आणि काँग्रेस मधल्या राजकीय भांडणांशी लावण्याचा प्रयत्न केला आहे.
वास्तविक अरविंद शिंदे यांनी आपल्याला आडवी जाणारी मांजर घुसली हुसकून लावली हे नानांना कळले देखील नाही. कारण व्हिडिओत दिसणाऱ्या नानांच्या बॉडी लॅंग्वेजवरून ते कुठेही मांजरीमुळे अडखळल्याचे दिसत नाहीत.
पण तरी देखील काँग्रेसमध्ये सध्या सर्वच काही आलबेला नसल्यामुळे आणि नाशिक पदवीधर मतदार संघात सध्या सत्यजित तांबे एपिसोड घडत असल्यामुळे त्यातून निर्माण झालेला राजकीय वाद आणि नानांना आडवी जाऊ पाहणारी मांजर याचा मजेशीर राजकीय संबंध मराठी माध्यमांनी जोडला आहे.
त्यातच पुण्यात देखील माजी शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अविनाश बागवे हे सत्यजित तांबे एपिसोडे रिपीटेशन घडविण्याच्या बेतात असल्याच्या बातम्या आहेत. नगरसेवक रशीद खान यांना काँग्रेसमध्ये फेरप्रवेश दिल्याबद्दल त्यांची नाराजी आहे. त्यामुळे अविनाश बागवे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. म्हणूनच आता नानांना काँग्रेस हाऊसच्या प्रवेशद्वाराजवळ आडवी जाऊ पाहणारी मांजर मांजर बाकीच्यांना कुठल्या कुठल्या प्रवेशाची वाट दाखवते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!!
Cat crossing may be superstitious, but how will Congress overcome its factionalism??
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राच्या “जॅम पॅक्ड पोलिटिकल स्पेस”मध्ये केसीआर चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला संधी किती??
- काँग्रेस – राष्ट्रवादी हे कसले धर्मनिरपेक्ष पक्ष?, त्यांनी फक्त मुसलमानांची मते घेतली; खासदार इम्तियाज जलील यांचे शरसंधान
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची 7 महिन्यांत 3600 रुग्णांना 28.32 कोटींची मदत; यादीत नव्या आजारांचाही समावेश