Monday, 12 May 2025
  • Download App
    संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल; बार्शीतील अत्याचारग्रस्त मुलीचा फोटो ट्वीट करणं भोवलं!Case filed against Sanjay Raut Beacuse The photo of the abused girl in Barshi be tweeted

    संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल; बार्शीतील अत्याचारग्रस्त मुलीचा फोटो ट्वीट करणं भोवलं!

    SANJAY RAUT

    हे कृत्य सुद्धा पीडित मुलीवरील अत्याचाराचाच भाग मानले गेले आहे.

     प्रतिनिधी

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर झालेले लैंगिक अत्याचार प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधणारे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे. Case filed against Sanjay Raut Beacuse The photo of the abused girl in Barshi be tweeted

    बार्शीतील ‘त्या’ घटनेवरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधणाऱ्या संजय राऊतांना आशिष शेलारांकडून प्रत्युत्तर, म्हणाले…

    संजय राऊत यांनी ट्वीटरवर पीडित मुलीचा फोटो शेअर केला होता. यामुळे या मुलीची ओळख उघड झाल्याने हे कृत्य सुद्धा पीडित मुलीवरील अत्याचाराचाच भाग मानून खासदार संजय राऊत यांच्या विरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    काय म्हणाले होते संजय राऊत? –

    ‘’देवेंद्रजी. हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत? ५ मार्चला हल्ला झाला आरोपी मोकाट आहेत.’’ असं संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे आणि सोबत रक्तबंबाळ अवस्थेत पडून असलेल्या पीडित मुलीचा फोटोही शेअर केला होता.

    सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील ही घटना आहे. एका अल्पवयीन मुलीवर आगोदर बलात्कार आणि नंतर तिच्या कुटुंबीयांवर गुंडांनी हल्ला केल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. पीडित मुलीवर अद्यापही उपचार सुरु आहेत. तर या घटनेचे पडसाद विधान परिषदेमध्येही उमटले आहेत. यावरून संजय राऊतांनी राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत, फडणवीसांवर निशाणा साधला. शिवाय आरोपी भाजपा कार्यकर्ते असल्याचेही संजय राऊत म्हणाले आहेत.

    Case filed against Sanjay Raut Beacuse The photo of the abused girl in Barshi be tweeted

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!