प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेडणेकर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळे ही कारवाई त्यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे.Case filed against former mayor Kishori Pednekar in Kovid center scam, big blow to Thackeray group
यासंबंधीच्या वृत्तानुसार, मुंबईतील आग्रीपाडा पोलिस ठाण्यात किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेडणेकरांसह महापालिकेच्या इतर 2 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप आहे.
कोरोना काळातील टेंडर प्रक्रिया गैरव्यवहार
कोरोना काळात मुंबई महापालिकेने काढलेल्या काही टेंडरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला. त्यात किशोरी पेडणेकर यांचा हात आहे, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, या प्रकरणी मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडी बॅग 2 हजारांऐवजी 6800 रुपयांना खरेदी करण्यात आली होती.
घोटाळ्यामागे पेडणेकर?
या कालावधीत मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर होत्या. वादग्रस्त कंत्राट त्यांच्याच इशाऱ्यानुसार देण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. या प्रकरणी तपास संस्थेने गत 21 जून रोजी राज्यभरात छापेमारी केली होती. त्यात 68 लाख 65 हजार रुपयांची रोकड, 150 कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. याशिवाय 15 कोटींची एफडी व अन्य गुंतवणूकही या प्रकरणी हाती लागली होती. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण व सुजीत पाटकर यांच्यासह 10 ते 15 जणांविरोधात ही कारवाई करण्यात आली होती.
किशोरी पेडणेकर तुरुंगात जाणार – सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी किशोरी पेडणेकर लवकरच तुरुंगात जातील असा इशारा दिला आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात बॉडीबॅग खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी 1500 रुपयांची बॉडी बॅग 6700 रुपयांनी घेतली.
या प्रकरणी पेडणेकरांसह अतिरिक्त आयुक्त आणि वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपने या संबंधीची तक्रार मुंबई पोलिसांकडे दाखल केली होती. या प्रकरणी आणखी 3 घोटाळ्यांचा तपास सुरु आहे. यावरही कारवाई होणार आहे. यापूर्वी संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर जेलमध्ये गेले. आता किशोरी पेडणेकर आणि नंतर आणखी 3 नेते तुरुंगात जाणार, असे सोमय्या म्हणाले.
Case filed against former mayor Kishori Pednekar in Kovid center scam, big blow to Thackeray group
महत्वाच्या बातम्या
- ‘चांद्रयान-3’ बद्दल GOOD NEWS! चंद्राच्या कक्षेत पोहोचले, ‘इस्रो’ने दिली माहिती
- नेमाडेंची मुक्ताफळे; औरंगजेबाच्या दोन राण्या काशीच्या पंड्यांनी केल्या भ्रष्ट; शिवाजी महाराजांचा मुख्य सरदार मुसलमान, तर औरंगजेबाचा हिंदू!!
- Earthquake: दिल्ली-एनसीआर मध्ये ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप, लोक घाबरून पळाले घराबाहेर
- तामिळनाडू : मंत्री व्ही.सेंथील बालाजी यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर ‘ED’चा छापा!