• Download App
    Cartoonist targets Raj Thackeray over Adani issue व्यंगचित्रकारांकडून राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली; म्हणे, अदानी कंपनीच्या प्रचाराचीच दिली फुल्ल टू गॅरेंटी!!

    व्यंगचित्रकारांकडून राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली; म्हणे, अदानी कंपनीच्या प्रचाराचीच दिली फुल्ल टू गॅरेंटी!!

    Raj Thackeray

    नाशिक : व्यंगचित्रकारांकडून राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली; म्हणे अदानी कंपनीच्या प्रचाराचीच दिली फुल्ल टू गॅरेंटी!!, असाच प्रकार राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरल्या भाषणानंतर समोर आला.Cartoonist targets Raj Thackeray over Adani issue

    – राजकडून अदानी टार्गेट, पण…

    ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कची कालची सभा प्रचंड गाजली, पण त्यातही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मात केली. उद्धव ठाकरेंनी आता बाजूला व्हावे. त्यांनी मुंबई महापालिकेची सूत्रे आदित्य ठाकरे यांच्याकडे द्यावीत, अशी सूचना करून जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंना गुगली टाकली. राज ठाकरे यांनी आपल्या डाव्या हाताच्या बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा तुतारीवाला माणूस हे चिन्ह ठेवून गौतम अदानी यांच्यावर जोरदार शरसंधान साधले. मोदी सरकार आणि फडणवीस सरकारच्या काळात एकट्या अदानींची कशी प्रगती झाली??, हे भारताचा आणि मुंबईचा नकाशा वापरून “सप्रमाण” दाखविले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भाषणाचे पडसाद दिल्लीपासून गल्लीपर्यंत उमटले सोशल मीडियावर त्यांच्या भाषणांनी धुमाकूळ घातला.



    – व्यंगचित्रकारांनी उडविली खिल्ली

    पण त्या पलीकडे जाऊन राज ठाकरे यांच्या भाषणातून व्यंगचित्रकारांना मोठे खाद्य मिळाले. अनेक व्यंगचित्रकारांनी राज ठाकरे यांनी गौतम अदानींच्या कंपन्यांचा फुकट प्रचार केला, अशी चित्रे काढून राज ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवली. गौतम अदानी यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्या भेटीचा चपखल वापर व्यंगचित्रकारांनी आपल्या चित्रांमधून केला.

    – वेगळ्या “नजरेतून” राज आणि अदानी

    व्यंगचित्रकारांनी मोदी आणि शाह यांच्या मांडीवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना बसविले, पण व्यंगचित्रात त्यांचे प्रतिबिंब अदानींच्या मांडीवर अदानी असेच दिसले. त्यामुळे भाजपला टार्गेट करायला गेलेल्या राज ठाकरे यांच्याकडे व्यंगचित्रकारांनी मात्र एका वेगळ्याच “नजरेने” पाहिले. राज ठाकरे यांनी भाजपला टार्गेट करण्यापेक्षा गौतम अदानी यांच्याच कंपन्यांचा प्रचार केला, हे यातून स्पष्ट झाले.

    (व्यंगचित्रकार : सुमंत बिवलकर आणि आलोक)

    Cartoonist targets Raj Thackeray over Adani issue

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पटेल नको असल्याच्या नुसत्याच पोकळ बाता; प्रत्यक्षात गुजरात्यांच्याच हातात दोन्ही राष्ट्रवादींच्या नाड्या!!

    जिल्हा परिषद निवडणुकीत मित्र प्रेमापोटी फडणवीसांचा प्रचाराचा त्याग, पण एकनाथ शिंदेंचा प्रचार मात्र जोरात!!

    Rupali Patil : रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या- अजितदादांचा अपघात की घातपात? ऐनवेळी पायलट का बदलले? पाच मृत्यू तर सहावी बॉडी कुठे!