Sunday, 4 May 2025
  • Download App
    मनोज जरांगेंशी गुफ्तगू करून महाराष्ट्रात "डबल M" कार्ड खेळायचा असदुद्दीन ओवैसींचा डाव!! Candidates from the OBC community won the election and became MP in Maharashtra

    मनोज जरांगेंशी गुफ्तगू करून महाराष्ट्रात “डबल M” कार्ड खेळायचा असदुद्दीन ओवैसींचा डाव!!

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील निवडणुकीत पडल्यानंतर संतापलेल्या खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी गुफ्तगू करून महाराष्ट्रात “डबल M” म्हणजे मराठा + मुस्लिम कार्ड खेळायचा डाव रचला आहे. Candidates from the OBC community won the election and became MP in Maharashtra

    मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या बरोबरच मुस्लिम आरक्षणाचा देखील पुकारा केला आहेच. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर आले असताना असदुद्दीन ओवैसी यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चेसाठी सकारात्मकता दाखवली. मनोज जरांगे यांचा प्रस्ताव आला तर पत्रकारांना सोबत घेऊन त्यांच्याशी चर्चा करेन, असे ओवैसी म्हणाले.

    बीडमधून जरांगे यांच्या मुळे पंकजा मुंडे पडल्या. त्यांना विजय मिळत आहे. मग मुस्लिम का जिंकत नाही?? महाराष्ट्र 11 % मुस्लिमसाठी दुःख आहे. त्यांच्याकडून बोलवणं येत असेल तर नक्की त्यांच्याशी बोलू, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले. ओवैसी आणि जरांगे यांची सकारात्मक चर्चा झाली, मराठा समाज आणि मुस्लिम समाज एकत्र आला तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    ओवैसी म्हणाले :

    मी मनोज जरांगे यांची इज्जत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. मनोज जरांगेंमुळे मराठवाड्यात 8 खासदार निवडून आले. पण एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. सर्व समाजाचे उमेदवार जिंकतात. पण मुस्लिम उमेदवार जिंकत नाही. इम्तियाज जलील निवडून आले नसल्याने महाराष्ट्रमधील मुस्लिम समाजात राग आहे. आमचा एकमेव उमेदवार जिंकून आला नसल्याचा दुःख आहे. मुस्लिम सर्वांना मतदान केलं. मग आम्हाला का मतदान करत नाही. यावर मुस्लिम समाजाने विचार केला पाहिजे. मनोज जरांगे यांच्याकडून शिकले पाहिजे.

    मुस्लिम आरक्षणाबाबत न्यायालयाचे आदेश आहे. मोदी म्हणतात मी बँकवर्डचा नेता आहे. मग आरक्षणाच्या टक्क्यांचं बिल आणा. महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार निवडून दिला नाही. आमचा एक उमेदवार होता त्याला देखील सर्वांनी मिळून हरवलं आहे. आम्ही सर्वांना मत दिली. पण आमचा उमेदवार पाडला. बुलडोझर फक्त मुस्लिम लोकांच्या घरावर चालतात. आम्हीच फक्त भाजपचे विरोधक आहेत. त्यांना विचारा भीमा कोरेगावत जीव गेले. उद्या विरोध करण्याचा मुद्दा आल्यास भाजपला आम्ही विरोध करणार आहे. संपूर्ण लोकसभा निवडणुकीत एक मर्द जलील उभा होते. त्यांना पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. आम्ही जिंकण्यासाठी लढतो, कुणाला पाडण्यासाठी लढत नाही. इम्तियाज जलील यांची कमतरता लोकसभेत जाणवते. पण प्रश्न असा आहे की नुकसान कुणाचं होत आहे?, असा सवाल ओवैसींनी केला.

    पण मराठा आरक्षण शांतता रॅलीचा पहिला टप्पा संपताना मनोज जरांगे यांच्याशी गुफ्तगू करून महाराष्ट्रात “डबल M” अर्थात मराठा + मुस्लिम कार्ड खेळायचा डाव असदुद्दीन ओवैसी यांनी रचल्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

    Candidates from the OBC community won the election and became MP in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!

    ‘प्रो रेसलिंग प्रकारात भारताला ‘रेसलिंग एक्स्ट्रीम मॅनियामुळे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध’

    Harshvardhan Sapkal बीडच्या बदनामीचे चित्र बदलून सामाजिक सद्भाव वाढीस जावा: हर्षवर्धन सपकाळ यांची अपेक्षा