विशेष प्रतिनिधी
मुंबई : महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.कायदेशीर मदत न मिळाल्यामुळे आणि किरकोळ कारणांसाठी कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदींसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे.Campaign ‘Mission Mukta’! Yashomati Thakur will launch this campaign for the release of women prisoners
या मोहिमेमुळे महिला कैद्यांना कारागृहातून सोडवण्यासाठी मदत होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.महिलांना कायदेशीर मदत करून त्यांना कारागृहातून सोडविण्यासाठी सहकार्य करणे व त्यांचे समुपदेशन करणे
याकरिता महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, तुरुंग प्रशासन यांच्यासोबत राज्य महिला आयोग सहभाग घेवून ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे.विधीसेवा न मिळाल्याने कारागृहात असलेल्या महिलांना विधीसेवेचे सहकार्य देण्याकरिता सुरुवातीला महाराष्ट्रातील महिला कच्चे कैदी, त्यांची प्रलंबित प्रकरणे याचा अभ्यास करणे
व त्यांच्या गरजेनुसार विधीसेवा सहकार्य व समुपदेशन देणे. त्यांना आवश्यक असल्यास पुनर्वसनकरिता मदत करणे या पद्धतीचे काम विभागाच्या माध्यमातून करता यावे याकरिता मिशन मुक्ता कार्यरत असेल. यामध्ये कैद्यांच्या पुनर्वसनकरिता काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचाही सहभाग असेल, असेही ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
Campaign ‘Mission Mukta’! Yashomati Thakur will launch this campaign for the release of women prisoners
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारच्या तुघलकी निर्णयाने नाट्यकर्मी संतप्त, 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरू करून काय उपयोग?
- आर्मी इंटेलिजन्सच्या लेफ्टनंट कर्नल महिलेने केली आत्महत्या, पुण्यात सुरू होते ट्रेनिंग
- अमित खरे यांची पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून नियुक्ती
- एलआयसीची खास योजना ; एकदा प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला मिळणार आयुष्यभर पेन्शन