• Download App
    पिंजऱ्यात बंदिस्त मोर वनविभागाकडे सुपूर्द ; वाईल्ड ऍनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीची कामगिरी। Caged peacock handed over to forest department ; Performance of the Wild Animals and Snacks Protection Society

    पिंजऱ्यात बंदिस्त मोर वनविभागाकडे सुपूर्द ; वाईल्ड ऍनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीची कामगिरी

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : वाईल्ड ऍनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे सदस्य ऋग्वेद रोकडे हे शिरूरमधील निरवी गावी साप वाचवण्यासाठी गेले असता त्या गावातील एका घराच्या अंगणातील पिंजऱ्यात मोर बंदिस्त अवस्थेत आढळून आला. त्यांनी वाईल्ड ऍनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे (WASPS) अध्यक्ष आनंद अडसूळ यांना कळविले. Caged peacock handed over to forest department ; Performance of the Wild Animals and Snacks Protection Society

    वाईल्ड ऍनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे सदस्य पुणे शहरामध्ये वन्यप्राणी वाचवण्याचे काम २४ तास आणि विनामूल्य करत असतात. संस्थेने संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी म्हसेकर सर यांना कळविले. त्यांनी संबंधित वनपाल केते आणि वनरक्षक चव्हाण यांना कारवाईसाठी रवाना केले. कारवाई दरम्यान असे दिसून आले की शेतकऱ्याला तो मोर जखमी अवस्थेत मिळाला होता. आणि वनाधिकाऱ्यांनी तो मोर ताब्यात घेण्यास शेतकऱ्याने मदतही केली.

    WASPS चे उपसचिव साईराज ढेरे आणि महेश पवार सोमनाथ भंडलकर, नागेश जाधव बाकी सदस्यांनी लोकांना मोराचे महत्व पटवून दिले. आणि त्याबरोबर इतरही वन्य जीवाची माहिती देऊन जनजागृती केली.

    आनंद अडसूळ यांनी सांगितले की, लोक अजूनही स्वतःच्या हौसेपायी मोर/पोपट असे वन्यपक्षी पाळतात. या सर्व घटनेवरून असे दिसून येते की लोकांमध्ये आणखीन जनजागृती करण्याची गरज आहे. त्यासाठी वनविभागाने वेगवेळे उपक्रम हाती घेऊन जनजागृती करावी. तसेच लोकांमध्ये प्राण्यांचे आणि पक्ष्यांबद्दलचे प्रेम जागृत करणे गरजेचे आहे. आपल्या सोबत या पृथ्वीवर आपल्या इतकाच त्यांचा ही अधिकार आहे. आणि आपल्या जीवनात त्यांचे महत्व ही पटवून देणे गरजेचे आहे.

    Caged peacock handed over to forest department ; Performance of the Wild Animals and Snacks Protection Society

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस