• Download App
    मंत्रिमंडळाचा विस्तार आणि एकत्रित खातेवाटप उद्याच; संजय शिरसाटांचा दावा Cabinet expansion and consolidated accounts tomorrow

    मंत्रिमंडळाचा विस्तार आणि एकत्रित खातेवाटप उद्याच; संजय शिरसाटांचा दावा

    प्रतिनिधी

    मुंबई : शिंदे – फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल नवी दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा केली. या पार्श्वभूमीवर उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. Cabinet expansion and consolidated accounts tomorrow

    मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनाच्या नंतरपर्यंत आता लांबणार नाही तो उद्याच होणार हे आता ठामपणे सांगतोय. सगळी चर्चा पूर्ण झालेली आहे, आता फक्त मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि एकत्रित खातेवाटप होईल. मंत्रिमंडळ विस्ताराला आता उशीर होणार नाही. तो उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे. आज सगळ्यांना निरोप जातील, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले.



    टाळ्या वाजवत बसा

    अजित पवार आणि प्रफुल पटेल हे सत्तेत आल्यानंतर सदिच्छा भेट म्हणून अमित शाह यांना भेटायला गेले होते. नेते म्हटलं तर राजकीय चर्चा आलीच, असं ते म्हणाले. शिंदे गटात कुठलीही नाराजी किंवा अस्वस्थता नाही. संजय राऊत यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावू नये, भडका उडालाय, हाणामाऱ्या करतायत अस सांगून ते वातावरण बनवत आहेत. पण ते आमच्या मर्दानगीचं लक्षण आहे. त्यांनी फक्त टाळ्या वाजवत बसा. स्वतःच घर जळलं तरी दुसऱ्यांची घर जळत असताना आनंद साजरा करणारी राऊतांची औलाद आहे, अशी शिरसाट यांनी केली.

    वरिष्ठ निर्णय घेतील

    यावेळी त्यांनी आशिष जैस्वाल यांच्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. जो उठाव झाला तो कुण्या एकट्यामुळे झाला नाही. सर्वांचं त्यात समान योगदान आहे. सगळे सोबत होते म्हणून हे घडलं. मंत्रिपद मिळावं ही सर्वांची इच्छा असते. पण कोणाला काय द्यावं हे सगळं वरिष्ठ नेते ठरवतात. ते निर्णय घेतीलच, असं त्यांनी स्पष्ट केलं.

    Cabinet expansion and consolidated accounts tomorrow

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची तुरुंगवारी टळली; हायकोर्टाकडून 1 लाखाचा जामीन मंजूर; पण शिक्षेला स्थगिती नाही, आमदारकीवरही टांगती तलवार!

    ज्ञान, साधना आणि संस्कृतीचा संगम ऋषभायन आंतरराष्ट्रीय परिषदेच्या प्रदर्शनात देवेंद्र फडणवीसांचे ब्राह्मी लिपीत नाव!!

    World Hindu Economic forum : नवोन्मेष, आत्मनिर्भरता आणि समृद्धीचा भारतीय मार्ग हिंदू नीती अर्थव्यवस्थेच्या विचार पद्धतीत!!