नाशिक : मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशन तयार करून महाराष्ट्रातल्या साधारण 120 विधानसभा मतदारसंघांमध्ये “मराठा शक्ती”चा प्रयोग करण्याचा इरादा मनोज जरांगे यांनी बोलून दाखविला. त्यात आपले निवडूनही आणू आणि समोरच्यांचे पाडू. देवेंद्र फडणवीस यांना धडा शिकवू, अशी गर्जना जरांगे यांनी केली. यातून जरांगे यांच्या निवडणुकीनंतरच्या इराद्याची स्पष्ट कल्पना उघड्यावर आली. महाराष्ट्रात महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्ही सत्तेवर नकोत. कारण दोन्हीपैकी कुणीही सत्तेवर आले, तर कुणीतरी मराठेतरच मुख्यमंत्री होणार किंवा सत्तेवर त्याचे नियंत्रण असणार याची जाणीव जरांगे आणि त्यांच्या मास्टर माईंडला झाली आहे. त्यामुळे नको ती महायुती आणि नको ती सध्याची महाविकास आघाडी, त्यापेक्षा वेगळाच पर्याय तयार करून नवा “पुलोद प्रयोग” करायचा मास्टर माईंडचा इरादा जरांगे यांच्या भाषणातले “बिटवीन द लाईन्स” होते.
मुस्लिम धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी यांना भेटून आल्यानंतर 100 पेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरणे प्राप्त आहे, असे जे जरांगे म्हणाले, त्यातून मराठा + मुस्लिम शक्तीकडेच राज्याची सूत्रे यावीत हा इरादा उघड झाला.
महाराष्ट्रात 288 पैकी मराठा प्रभावाचे 80 मतदारसंघ आणि आरक्षित 54 पैकी 36 मतदारसंघ यावर कॉन्सन्ट्रेशन करून निवडणुकीत उतरण्याचा इरादा जरांगे यांनी व्यक्त केला आहे. त्यातही एससी – एसटी जागांच्या वाट्याला जाऊ नका, असा इशारा मराठा उमेदवारांना दिला आहे.
– निवडून आणा, मास्टर माईंडच्या वळचणीला जाऊन बसा
जरांगे यांच्या या सगळ्या राजकीय हालचाली नव्या पुलोद प्रयोगाच्या दिशेने सुरू असल्याचेच निदर्शक आहे. कारण जरांगे यांच्या आंदोलनाचा फायदा घेऊन महाविकास आघाडी जरी अगदी पूर्ण बहुमतानिशी सत्तेवर आली तरी, काँग्रेस किंवा शिवसेना यांचाच मुख्यमंत्री करावा लागणार, त्यातही काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला, तर तो आपले ऐकणार नाही याची जाणीव जरांगे यांच्या मास्टर माईंडला आहे, मग जर काँग्रेसचा किंवा उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करायचे असेल तर, आहे ती महाविकास आघाडी निवडणुकीनंतरही टिकवण्यात मतलब काय??, त्यापेक्षा वेगळीच वाट चोखाळू किंवा जुना पुलोद प्रयोग नव्याने करू, असा विचार मास्टर माईंडने केला असल्यास त्यात नवल नाही, म्हणूनच जरांगे यांच्या निवडूनही आणि समोरच्यांचे पाडू या राजकीय धोरणात निवडून आणलेले मास्टर माईंडच्या वळचणीला नेऊन बसविणे हाच इरादा दिसतो आहे.
मनोज जरांगे यांच्या या इराद्यावर ओबीसी आरक्षण आंदोलन लक्ष्मण हाके यांनी नेमकेपणाने बोट ठेवले. जरांगे यांनी निवडणूक लढवण्याच्या फंदात पडूच नये. त्यांनी सरळ तुतारीला पाठिंबा देऊन मोकळे व्हावे, असे उघडपणे आवाहन लक्ष्मण हाके यांनी करून जरांगे यांची पुढची राजकीय दिशाच दाखवून दिली आहे.
Manoj jarange pattern to set new PDA experiment
महत्वाच्या बातम्या
- Jammu and Kashmir जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, डॉक्टरांसह ६ जण ठार
- Jawan Amar Pawar : छत्तीसगड येथील नक्षलवादी चकमकीत साताऱ्यातील जवान अमर पवार शहीद
- DGCA chief : केंद्राने DGCA प्रमुखांना हटवले, 30 विमानांना आल्या बॉम्बच्या धमक्या, NIA आणि IB कडून मागवला अहवाल
- PFI : ईडीचा आरोप- आखाती देशांमध्ये 13,000 सक्रिय पीएफआय मेंबर्स; कोट्यवधी रुपयांचा निधी उभारण्याचे त्यांचे टार्गेट