देशभरातील एकूण ३३ मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून यामध्ये महाराष्ट्रातल्या नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा देखील समावेश आहे.By-elections of 33 constituencies across the country including Degalur in Maharashtra announced; Voting ends October 30
विशेष प्रतिनिधी
मुंबई: देशभरातील एकूण ३३ मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून यामध्ये महाराष्ट्रातल्या नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा देखील समावेश आहे.
पुढील महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असेल. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं करोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीप्रमाणे, या निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ११ ऑक्टोबरपर्यंत अर्जांची छाननी केली जाणार असून १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. यानंतर ३० ऑक्टोबर रोजी मतदान होईल, तर २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाईल.
By-elections of 33 constituencies across the country including Degalur in Maharashtra announced; Voting ends October 30
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई-पुण्यात झोपडपट्ट्यांमध्ये नक्षल चळवळीचा प्रचार – प्रसार; मुख्यमंत्र्यांनी अमित शहांसमोर व्यक्त केली चिंता
- Bhabanipur by Polls : कोलकाता डीसीपीवर भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार
- Nagpur Education Policy : NEPला RSS किंवा ‘नागपूर शिक्षण धोरण’ म्हटले तर आनंदच मुख्यमंत्री बोम्मई
- कोरोना कालावधीतील सरकारी खर्चावरील निर्बंध उठले, अर्थ मंत्रालयाच्या सूचना, विभाग आता बजेटच्या अंदाजानुसार खर्च करू शकतील
- ‘कोणीही टाळी वाजवली नाही’, चिदंबरम यांचा पीएम मोदींच्या यूएनजीएच्या भाषणावर टोमणा, सिब्बल यांचीही टिप्पणी